नागाव (आसाम) :- बदलापूर येथील चिमुरड्यांवर झालेल्या बलात्कारचं प्रकरण आणि कोलकाता येथे डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर झालेली तिची हत्या ही दोन्ही प्रकरणं ताजी असतानाच आता अशीच एक घटना समोर आली आहे.एका अल्पवयीन मुलीवर ती ट्यूशनवरुन परतत असताना सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही मुलगी अर्धवट बेशुद्ध अवस्थेत सापडली आहे. या घटनेने नागरिकांचा प्रचंड संताप झाला आहे. लोकांनी आंदोलन करत या प्रकरणातल्या नराधमांना अटक करण्याची मागणी केली आहे.
सामूहिक बलात्काराची ही घटना कुठे घडली?
गुरुवारी संध्याकाळी ही मुलगी ट्यूशनवरुन घरी परतत असताना बलात्काराची घटना घडली. आसाम येथील नागाव जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. या ठिकाणी असलेल्या विविध संघटना आणि नागरिकांनी आरोपींना अटक करण्याची मागणी करत बंद पुकारला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका १४ वर्षीय मुलीवर आसामच्या नागावमध्ये सामूहिक बलात्कार झाला. ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. ही मुलगी त्या भागातल्या नागरिकांना अर्धवट बेशुद्ध अवस्थेत सापडली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तिची वैद्यकिय चाचणी झाली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीवर तिघांनी बलात्कार केला. या मुलीचा जबाब महिला पोलीस अधिकाऱ्याने नोंदवून घेतला आहे. तसंच पोलिसांनी सांगितलं की या प्रकरणातले जे शास्त्रीय पुरावे आहेत ते आम्ही गोळा केले आहेत. पीडितेने केलेल्या वर्णनाप्रमाणे ते कोण आरोपी होते? त्यांचा शोध आम्ही घेत आहोत.अशी माहिती पोलीस अधीक्षक स्वप्ननील डेका यांनी पत्रकारांना दिली.
आसाममध्ये जनतेचा उद्रेक
आसामच्या नागाव भागात यानंतर जनक्षोभ उसळेला पाहण्यास मिळाला. १४ वर्षांच्या मुलीसह झालेलं हे कृत्य अमानुष आणि पाशवी आहे. या मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी आंदोलकांनी केली. त्याचप्रमाणे या प्रकरणी विविध ठिकाणी आंदोलनही करण्यात आलं. यानंतर आसामचे पोलीस महासंचालक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी या प्रकरणातल्या नराधमांना पकडून कठोरातलं कठोर शासन दिलं जाईल असं आश्वासन दिलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.कोलकाता या ठिकाणी एका डॉक्टरवर बलात्कार करुन तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर आता आसाममध्ये सामूहिक बलात्काराची ही घटना समोर आली आहे.
हे पण वाचा
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.