Viral Video: शाळा की हाणामारीचे मैदान! चालू वर्गासमोर पुरुष अन् महिला शिक्षकांत जोरदार हाणामारी;विद्यार्थी घाबरले कारण काय? पहा व्हिडिओ

Spread the love

Viral Video: चित्रकूट :- सोशल मीडियावर नेहमीच नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक वाटेल ते करू पाहतात. यावर शेअर केलेले व्हिडिओ कधी आपल्याला पोट शारून हसवतात तर काही व्हिडिओ अक्षरशः आश्चर्याचा धक्का देऊन जातात.यावर अणे धक्कादायक जीवघेणे स्टंटदेखील व्हायरल होत असतात. मात्र आता रिल्सची ही नाश शाळेपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे. जिथे या व्हायरल व्हिडिओमध्ये एक पुरुष व्यक्ती आणि महिला शिक्षिकेमध्ये आधी वाद आणि नंतर थेट मारामारी झाल्याचे दिसून येत आहे.

उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यामधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एक विचित्र घटना घडून आली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून यात एक पुरुष आणि शिक्षिका आपल्या सर्व मर्यादा सोडत शाळेच्या परिसरात चालू वर्गासमोर एकमेकांना हाणामारी करत असल्याचे दिसून आले. त्याच्यात यावेळी कोणत्या विषयावरून बचाबाची सुरु होती आणि नंतर अचानक त्यांचा पारा वाढला आणि दोघेही एकमेकांवर हल्ला करू लागले. हा सर्व प्रकार विद्यार्थ्यांसमोर झाल्याने यामुळे विद्यार्थी घाबरले असल्याची माहिती मिळाली.

याप्रकरणी आता दोन्ही व्यक्तींनी एकमेकांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रकुटमधील कुम्हारन पुरवा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सपना शुक्ला आणि अवधेश तिवार या दोन्ही शिक्षकांमध्ये हाणामारी झाली. अवधेश तिवारी यांनी सांगितले की, सपना शुक्ला शाळेत नेहमी रिल बनवत असते. त्यामुळे दुसरे लोक डिस्टर्ब होतात, असे आरोप त्यांनी सपना शुक्लावर लावले.तर दुसरीकडे सपना शुक्ला यांनी तिवारी यांच्यावर अश्लिल व्हिडिओ बनवल्याचा आरोप केला आहे. त्याने लपून त्यांचे व्हिडिओ काढले. सपना यांचे लक्ष गेल्यावर त्यांनी अवधेश यांच्या कानाखाली वाजवली. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी सुरु झाली.

या प्रकारामुळे विद्यार्थी चांगलेच घाबरले होते. दोघांना रोखण्यासाठी इतर शिक्षकांना वर्गात धाव घ्यावी लागली. दरम्यान आता शाळेतील या धक्कादायक प्रकरणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा @jitendra नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने प्रकरणाची चौकशी सुरु केली असून अजून जे काही तथ्य समोर येतील त्यानुसार यावर कारवाई होणार असल्याचे समोर येत आहे.

टीम झुंजार