एरंडोल येथे भव्य मोफत आरोग्य शिबिरात ५०० रुग्णांची तपासणी.

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल:
येथे कोरोना महामारी मुळे व निर्बंधांमुळे सामाजिक व धार्मिक कार्यक्रम बंद होते शासनाच्या आदेश स्थितीतील झाडामुळे यावर्षी जय श्रीराम प्रतिष्ठान श्रीराम चौक एरंडोल यांच्या अध्यात्मिक श्री हनुमान कथा सुरू आहे कथा विवेचन गोरक्षक श्री राजीव कृष्ण जी महाराज यांच्या मधुर वाणीतून तरुणांना हनुमान चालीसा अध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्व महाराज आपल्या विवेचनातून स्पष्ट करत आहेत.
दरम्यान आज ६ एप्रिल रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले यामध्ये डॉक्टर स्नेहल पाटील कल्पना हॉस्पिटल एरंडोल मधुमेह तपासणे, डॉक्टर वैभव चौधरी यांनी नेत्रतपासणी, डॉक्टर राहूल बी पाटील यांनी बाल रोग तपासणी, नाक कान घसा तपासणे डॉक्टर विनोद पवार श्वास हॉस्पिटल जळगाव डॉक्टर मनोज पाटील लोढा हॉस्पिटल जळगाव. यांच्या सहकार्याने सर्व ५०० रुग्णांची तपासणी करण्यात आली

यावेळी जय श्रीराम प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा.नितीन पाटील सर , उपाध्यक्ष अमर महाजन, सचिव प्रदीप फराटे, सदानंद पाटील, अवि जाधव,ज्ञानेश्वर पाटील, डॉ. सुमेध महाजन ,राकेश झा, मनोज झा, दिनेश पाटील, ऋषिकेश महाजन,अमित पाटील, सनी पाटील, अनंत पाटील, अजय महाजन,कृष्णा गुजर, ओम पाटील, देव जाधव, धीरज पाटील, मनोज महाजन, निखिल पाटील,टोनी शिरवानी, बंटी शिरवानी, अश्विन पाटील, पुष्पक पाटील संजय महाजन, प्रमोद चौधरी,यांच्यासह सर्व जय श्रीराम प्रतिष्ठान कार्यकारिणीने शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

टीम झुंजार