कोलकाता, बदलापूर घटनेच्या विरोधात शास्त्री फार्मसी महाविद्यालय तर्फे निषेध रॅली

Spread the love

एरंडोल :- महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये अनाकलनीय वाढ होत असल्याचे चित्र हल्ली जास्तप्रमाणात आपल्या समोर येत आहे. आत्ताच कोलकाता व बदलापूर येथे अत्याचाराचा लाजिरवाणा प्रकार घडला, त्याच्या निषेधार्थ शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी एरंडोल यांच्या वतीने गुरुवार दिनांक 29/08/ 2024 रोजी एरंडोल बस स्थानकापासून ते पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चामध्ये महिला व मुलींवर झालेल्या अत्याचारांबाबत कठोर शब्दात निंदा करण्यात आली तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून लोकांच्या मनात समाजातील महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे याबद्दल जागरूकता निर्माण करणारे पथनाट्य सादर करण्यात आले. माननीय प्रांताधिकारी साहेब, माननीय तहसीलदार साहेब, तसेच माननीय पोलीस निरीक्षक साहेब एरंडोल यांना डॉ.पराग कुलकर्णी सह महिला शिक्षक व विद्यार्थिनींनी निवेदन देऊन अश्या घटना रोखण्यासाठी नवीन कठोर कायदा करावा

आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी या बाबत विनंती सरकारकडे केली व मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चामध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पराग कुलकर्णी यांच्या समवेत HOD प्रा. जावेद शेख, प्रा. राहुल बोरसे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. विजय शास्त्री सचिव रूपा शास्त्री यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. असे महाविद्यालयाचे जन संपर्क अधिकारी शेखर बुंदेले यांनी कळवले.

हे पण वाचा

टीम झुंजार