VIDEO लखनौ:- प्रत्येकाच्या आयुष्यात आई-वडिलांना अनन्यसाधारण महत्व असते. आई-वडील मुलांवर जीवापाड प्रेम करतात. तसेच मुलंही आई-वडिलांवर प्रेम करतात. विशेषत: वडील मुलीचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी असते. वडिलांसाठी मुलगी एका राजकुमारीपेक्षा कमी नसते. अनेकदा ते आपले प्रेम व्यक्त करत नाहीत, पण मुलीला ते फुलाप्रमाणे जपतात. पण, काळजी करणारे हेच वडील जेव्हा आजारी पडतात तेव्हा सर्वात जास्त काळजी ही मुलांना असते.
अशातच फदर्स डे दिवशी बाप-लेकीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही भावूक व्हाल. यात आजारी वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलगी असे काही करते की पाहून तुमच्याही डोळ्यातून पाणी येईल.लखनौमधील एका रुग्णालयातून ही एक अनोखी घटना समोर आली आहे. येथे एका रुग्णालयातील आयसीयूमध्ये भरती असलेल्या वडिलांच्या इच्छेनुसार, त्यांच्या दोन मुलींचे लग्न त्यांच्यासमोर लावले. रुग्णाच्या इच्छेनुसार डॉक्टरांनी मौलानाला आयसीयूमध्येच बोलावून निकाह करण्याची परवानगी दिली, त्यानंतर निकाह पार पाडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.
समोर आलेल्या माहितीनुसार, लखनौ चौकातील मोहम्मद इक्बाल यांना दोन मुली आहेत, त्यांच्या दोन्ही मुलींचे लग्न या महिन्यात होणार होते आणि २२ तारखेला मुंबईत रिसेप्शन होणार होते. मात्र, मोहम्मद इक्बाल यांना आजारपणामुळे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झाली नाही. प्रकृती गंभीर असल्याने वडिलांनी आपल्या डोळ्यांदेखत दोन्ही मुलींचे लग्न व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.तसेच वडिलांच्या उपस्थितीत आपले लग्न व्हावे अशी मुलींचीही इच्छा होती.
यामुळे या कुटुंबीयांनी संपूर्ण प्रकरण संबंधित रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांना सांगितले. यानंतर डॉक्टरांच्या संमतीने वडिलांच्या डोळ्यांदेखत मुलींचे लग्न लावण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार मौलाना आणि मुलींचे होणारे पती वडील मोहम्मद इक्बाल यांच्यासमोर निकाह करण्यासाठी आयसीयूमध्ये पोहोचले. आयसीयूमध्ये दाखल असलेल्या मोहम्मद इक्बाल यांच्यासमोर त्यांच्या दोन्ही मुलींचा निकाह वाचण्यात आला आणि त्यांचे लग्न लावण्यात आले.लखनौमधील हे अनोखे लग्न आता चर्चेचा विषय ठरत आहे. लग्नानंतर मुलींना वडिलांनी आशीर्वाद दिले, पण वडील अजूनही आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.
हे पण वाचा
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४