सावदा (प्रशांत सरवदे प्रतिनिधी) –
सावदा परिसरातील एका नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना दिनांक ३० रोजी घडली याप्रकरणी सावदा पोलिसांनी अवघ्या तीन तासात दोन आरोपीला अटक तर एका अल्पवयीन आरोपींस बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे.
याबाबत पोलीस सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३० रोजी दुपारी साडेचार वाजता सावदा परीसरातील एक नामांकित शाळा सुटल्यावर पीडित अल्पवयीन मुलगी घरी जाण्यासाठी बसची वाट बघत असतांना तीन आरोपी एका मोटरसायकलवर आले व त्यांनी पीडित अल्पवयीन मुलीला तिच्या मामाच्या गावाच्या ओळखीचा फायदा घेऊन तिला सावदा येथे पोहोचवतो असे सांगून त्यांच्यासोबत मोटारसायकलीवर बसविले व त्यानंतर या नराधमांनी त्या अल्पवयीन मुलीस घरी न सोडता
सावदा मस्कावद रस्त्यावर नेले व तेथे रोडच्या बाजूने असलेल्या तुरीच्या व कपाशीच्या शेतात नेऊन दोघांनी आळीपाळीने पीडितेवर अत्याचार केला तर एकाने तिचा विनयभंग केला व घटनास्थळी अल्पवयीन पिडीतेला सोडून पळून गेले. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस स्टेशन येथे सी सी. टी एन एस नं.गुरनं १७३/२०२४, भारतीय न्यायसंहिता कलम ७०(२),७५(१)(१),३(५) सह बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण अधि.२०१२ चे कलम – ४,८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी सावदा पो. स्टे.ला माहिती प्राप्त होताच तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव डॉ. महेश्वर रेड्डी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक नखाते यांचे आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सावदा पोस्टे चे सपोनि विशाल पाटील, पोलीस उप निरीक्षक अमोल गर्जे यांनी अवघ्या ३ तासात एका अल्पवयीन व दोन संशयित अशा तीन आरोपीना ताब्यात घेतले .
यातील २ संशयीत आरोपी १) बंटी उर्फ आरिफ इस्माईल तडवी २) बंटी उर्फ किरण भीमराव मेढे यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दि ३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून एका अल्पवयीन आरोपीस बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.पुढील तपास स.पो.नि विशाल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय अमोल गर्जे , जयराम खोडपे,संजय तडवी व सहकारी करीत आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.