एरंडोलला शांतता समिती व गणेश मंडळ पदाधिका-यांची बैठक.
एरंडोल :- सर्व गणेश भक्तांनी गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करावा असे आवाहन चाळीसगाव विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी केले.नगरपालिका कार्यालयात गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शांतता समिती सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत त्या बोलत होत्या.माजी नगराध्यक्ष देविदास महाजन अध्यक्षस्थानी होते.नगरपालिका कार्यालयात गणेशोत्सवानिमित्त शांतता समिती सदस्य,गणेश मंडळाचे पदाधिकारी यांचेसह नगरपालिका,वीज वितरण कंपनी,महसूल कर्मचारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,ज्येष्ठ पत्रकार प्रा.शिवाजीराव अहिरराव,माजी उपनगराध्यक्ष जगदीश ठाकूर,डॉ.नरेंद्र पाटील,कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,यश काबरे,कौस्तुभ मानुधणे,संजय चौधरी,अमोल जाधव, पांडववाडा संघर्ष समितीचे प्रसाद दंडवते यांचेसह पदाधिका-यांनी स्थापना,विसर्जन मिरवणूक मार्गावरील रस्त्यांवर पडलेले खड्डे,विजेच्या लोंबळत आलेल्या तारा,रस्त्यावरील अतिक्रमणे,बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे,मद्यविक्री, मागील वर्षी विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडल्यानंतर देखील मंडळाच्या पदाधिका-यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे यासह विविध समस्या मांडल्या.
कौस्तुभ मानुधणे या युवकाने विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी होणारी दारूची विक्री होणार नाही याची पोलिसांनी दाखल घेण्याची मागणी केली. कौस्तुभ मानुधणे याने दारुबाबत मांडलेल्या भूमिकेचे अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी कौतुक केले. गणेशोत्सवापूर्वी मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल तसेच ठिकठीकाणी पथदिवे
लावण्यात येतील यासह विविध उपाययोजना पालिकेच्यावतीने करण्यात येणार असल्याचे कार्यालय अधीक्षक विनोद पाटील यांनी सांगितले.गणेशोत्सवात वीज पुरवठा खंडीत होणार नाही याचे नियोजन करण्यात आल्याचे सहाय्यक अभियंता माळी यांनी सांगितले.
अमळनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील नंदनवाळ यांनी सर्व गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणूक वेळेवर सुरु करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले.गणेशोत्सव पाहण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील हजारो महिला येत असल्यामुळे वेळेत मिरवणूक सुरु झाल्यास त्यांना देखील उत्सवाचा व मिरवणुकीचा आनंद घेता येत असल्याचे सांगितले. सार्वजनिक गणेश मंडळांनी उत्सवाच्या काळात स्वयंसेवकांची नियुक्ती करून महिलांच्या सुरक्षेबाबत दक्षता घेण्याच्या सुचना केल्या.अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले.
गणेशोत्सवात दोन समाजात वाद होईल असे कृत्य करणा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला.शहरात गणेशोत्सव शांततेत पार पडण्याची अनेक वर्षांपासून सुरु असलेली परंपरा यापुढे देखील कायम सुरु ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.सुधीर शिरसाठ यांनी सुत्रसंचलन केले.हवालदार अनिल पाटील यांनी आभार मानले.बैठकीस माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, अँड आकाश महाजन,अँड अहमद सय्यद, सागर चौधरी,मनसेचे तालुकाध्यक्ष विशाल सोनार,विठ्ठल वंजारी,गृहरक्षक दलाचे छोटू पहेलवान, मयूर बिर्ला, सचिन विसपुते,बबलू परदेशी,गोटू ठाकूर,शेख सांडू शेख मोहम्मद,कमरअली सय्यद,उमेश महाजन, प्रल्हाद देशमुख, आप्पा पाटील, सिद्धार्थ परदेशी, अमोल भावसार, मोहन महाजन, अमर साळी यांचेसह गणेश मंडळांचे पदाधिकारी,शांतता समिती सदस्य यांचेसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
हे पण वाचा
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४