दौड :- तालुक्यातून पुन्हा एकदा संतापजनक घटना समोर आली आहे. शहरात एका निराधार महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दौंड पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.ही घटना शहरातील गोल राऊंड परिसरात असणाऱ्या इंग्रजी माध्यम शाळेच्या शेजारील इमारतीमध्ये घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे पती रस्ते अपघातात मयत झाले आहेत. त्यामुळे निराधार झाल्याने त्यांनी दौंड मध्ये राहणाऱ्या एका महिलेकडे मदत मागितली.
तेव्हा आरोपी महिला निराधार महिलेला आपल्या घरी घेऊन गेल्या. दरम्यान, माझ्या मुली शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत, त्यामुळे आपण दोघी येथे राहू, असं आरोपी महिलेने पिडीत महिलेला सांगितले. त्यामुळे आरोपी महिलेवर विश्वास ठेवून पीडिता तेथे राहिल्या. दरम्यान, काही दिवसांनी आरोपी महिला यांचा भाऊ अमोल विटकर घरी आला तो सुद्धा तेथे राहू लागला. तेव्हा आरोपी महिला पीडीतेला म्हणाली की, त्याचे घरी भांडण झाले आहे, तो आपल्या सोबतच राहणार आहे. त्यामुळे पिडीता म्हणाल्या मी येथून जाते.
त्यानंतर आरोपी महिला पीडीतेला म्हणाली कि, तुला आता येथेच राहायचे आहे, तुझे कमी जास्त मीच बघणार आहे, हवे तर तू काम करत जा. काही दिवसानंतर पीडिता व आरोपी महिला पाटस रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवायला गेले. त्यावेळी तेथे हरिभाऊ येडे नावाचा व्यक्ती आणि त्याचा भाऊ येऊन त्यांच्यासोबत बसले. येडे याने पीडितेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर महिला व आरोपी महिला घरी आल्यानंतर पीडिताच्या खोलीत अमोल विटकर शिरला. त्यावेळी आरोपी महिलेने खोलीचा दरवाजा बाहेरून लावून घेतला.
आरोपी अमोलने महिलेवर रात्री दोन तास अत्याचार केला. तसेच दुसऱ्या दिवशी आरोपींनी महिलेला राशीन (जि. नगर) येथील एका घरी नेले. तेथे तिघांनी तिला मारहाण केली. तसेच कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पीडित महिलेने आरोपींची नजर चुकवुन तेथून पळ काढला. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.