एरंडोल :- येथील नगरपरिषदेमार्फत सन 2022- 23 ते 2025-26 साठी ची 15% टक्के करववाढीस स्थगिती मिळावी व न. पा.हद्दीतील खरेदी विक्रीवर आकारला जाणारा 1% कर रद्द करण्यात यावा या मागणीचे निवेदन पालकमंत्री भाऊ सो. गुलाबरावजी पाटील यांना देण्यात आले उपोषणकर्ते श्री गोरख चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गट शहर अध्यक्ष सोबत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री किशोरजी काळकर राजेंद्र आबा चौधरी मा. नगराध्यक्ष . अमित दादा पाटील राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष. आनंदा चौधरी ( भगत ) शहर प्रमुख शिंदे गट शिवसेना
विजय अण्णा महाजन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जगदीश पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख उबाठा गट. एस आर बापू पाटील भाजपा माजी तालुका अध्यक्ष व एरंडोल शहरातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते एरंडोल व पारोळा या दोन्ही शहरात एकाच वेळेस करवाढ झालेली होती एरंडोल मतदारसंघाचे आमदार श्री चिमनरावजी पाटील यांनी म. मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन पारोळा येथील करवाढिस स्थगिती मिळवली त्या धर्तीवर एरंडोल नगरपालिके केलेल्या करवाढिस स्थगिती मिळावी या संबंधित माननीय गुलाबराव पाटील यांनी आश्वासित केले की महाशय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडून एरंडोल नगरपालिकेत स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले.
हे पण वाचा
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४