
पीडितेने संशयित आरोपी वकीलाच्या विरोधात ॲट्रासिटीसह बलात्कार,अवैध सावकारीचा गुन्हा केला दाखल.
अँड.संजय हरिप्रसाद कनोजी (रा.तनिश पार्क, जेलरोड) असे संशयित वकीलाचे नाव असून, त्यास मंगळवारी रात्री अटक करण्यात आली आहे.
नाशिक :- कामानिमित्ताने घरी बोलावून चहातगुंगीचे औषध पाजले. त्यानंतर पीडितेवर अत्याचार करून त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. ते चित्रीकरण सोशल मीडियासह पीडितेच्या कुंटूंबियांना दाखवून बदनामीची धमकी देत पाच वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या वकीलाविरोधात नाशिकरोड पोलिसात ॲट्रासिटी, बलात्कार आणि अवैध सावकारीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अँड. संजय हरिप्रसाद कनोजी (रा. तनिश पार्क, जेलरोड) असे संशयित वकीलाचे नाव असून, त्यास मंगळवारी (ता. ३) रात्री अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, पीडितेचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय असून, २०१९ मध्ये पीडिता संशयिताच्या घरी त्याच्या पत्नीचे फेशियल करण्यासाठी गेल्या असता ओळख झाली. त्यानंतर कोरोनामुळे पीडितेची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाल्याने संशयिताने घरी बोलाविले. गुंगीमिश्रीत चहा पिण्यास दिल्यानंतर तिच्यावर अत्याचार केला.
त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व तिच्या कुटूंबियांना दाखविण्याची धमकी देत संशयिताने आजतागायत वारंवार पीडितेवर अत्याचार केले. मुंबई, गोवा, पालघर, त्र्यंबकेश्वर, पहिने याठिकाणी नेऊन पीडितेच्या इच्छेविरोधात अत्याचार केले.तसेच, पीडितेच्या पतीच्या आधारकार्डवर स्वतःचा फोटो चिकटवून त्याचा गैरवापर केला.
जातीवाचक बोलून वारंवार अपमान केला आणि २५ हजार रुपये व्याजाने देऊन त्यामोबदल्यात त्याच्या कामाच्या मोबदल्यातून व्याजासह हजार रुपये कापून घेत होता. अशारितीने संशयिताने अनेकांना गंडविले व महिलांवर अत्याचार केल्याचा दावाही पीडितेने केला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात संशयित वकील कनोजे याच्याविरोधात बलात्कारासह अवैध सावकारी प्रतिबंधात्मक, व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी हे करीत आहेत.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






