VIDEO : मुंबई लोकल असो वा दिल्ली मेट्रो अनेक अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. लोकल ट्रेनचा वापर आतापर्यंत प्रवासासाठी हजारो नागरिक करत होते. मात्र गेल्या काही वर्षात मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाचे रिल्स व्हिडिओ बनवणे तर कधी लोकलमध्ये लग्नही पार पडत असे.वेळोवेळी या सर्वांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. अशातच एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,जो मुंबईच्या लोकल ट्रेनमधील आहे. मात्र या तरुणाने कोणताही धोकादायक स्टंट केला नाही तर एक धक्कादायक असा डान्स केलेला आहे.
पाहा तरी नक्की तरुणाचा डान्स कसा आहे?व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मुंबई लोकल दिसत आहे. या लोकलमध्ये सफेद रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाची पँड परिधान केलेला एक तरुण आहे. सुरुवाती तो लोकल ट्रेनच्या आतमध्ये येतो आणि उभा राहतो. मात्र काही वेळातच तरुण डान्स करण्यास सुरुवात करतो. मात्र डान्स करत असताना एक एक स्टेप्स असं काही करतो की लोकलमधील प्रत्येक प्रवासी या तरुणाला घाबरुन जातात तर काही प्रवाशी आश्चर्यजनक होताना व्हिडिओ दिसून येत आहे. व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्की समजेल की लोकल ट्रेनमधील प्रवाशी का हैराण झाले आहेत.
मात्र तुम्ही व्हिडिओ पाहून म्हणाल की,’ तरुणाला हाडं आहेत की नाही?व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ”@adityacrazyy” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ चार दिवसापूर्वी व्हायरल होताच व्हिडिओला नऊ लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी पंसत केलेला आहे शिवाय मोठ्या प्रमाणात व्हिडिओला व्ह्यूज (Views) मिळाले आहेत.
व्हिडिओ अनेक मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होताच अनेक प्रतिक्रिया येत आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल होताच त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,’कसं तरी वाटत आहे त्याला पाहून’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,’भाई कमाल’. अनेक अंचबित तर काहींच्या हैराणजनक प्रतिक्रिया व्हिडिओवर आलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा