दुर्दैवी घटना ! बारावीच्या पेपरला जाणाऱ्या विध्यार्थीनीसह तरुणांच्या दुचाकीला अपघात दोघे ठार-

Spread the love

पायलचा बारावीचा अखेरचा पेपर ठरला अखेरचाच
काका गाडी पाचोऱ्याला थांबली नाही मी आता काय करू

पायलचे हे बोलणे ठरले काकांशी अखेरचे

प्रतिनिधी । चाळीसगाव
गाळण ता.पाचोरा येथे बारावीचा पेपर देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचा झालेल्या मोटरसायकल अपघातात दोघांचा मृत्यु
बाबत वृत्त की जळगाव येथील विद्यार्थिनी पायल कैलास पवार वय १९ राहणार जळगाव हि बारावीच्या मराठी च्या पेपर साठी गाळण ता.पाचोरा येथे जाण्यासाठी निघाली असता नजर चुकीने पाचोरा न थांबणाऱ्या रेल्वे गाडीत बसली सदर गाडी पाचोरा येथे न थांबल्याने ती सरळ चाळीसगाव येथे थांबल्याने बारावीचा पेपर महत्वाचा असल्याने पायल हिने जळगाव येथील आयुष करियर अकॅडमी येथील शिक्षकांशी संपर्क साधून झालेल्या घटनेची माहिती दिली.

सरांनी तात्काळ कन्नड तालुक्यातील पांगरे येथील तेजस सुरेश महेर ( वय २० ) या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून चाळीसगाव येथून पायल ला घेऊन येण्या बाबत विनंती केली त्या प्रमाणे चाळीसगाव येथुन गाळण परीक्षा केंद्रावर जात असताना भडाळी भामरे रस्त्यावर पिकअप व्हॅन व मोटरसायकल मध्ये झालेल्या अपघातात तेजस सुरेश महेर वय २० राहणार पांगरा ता.कन्नड हा जागीच मरण पावला तर पायल कैलास पवार ( वय १९ ) ही शुद्धीवर असल्याने तेथील ग्रामस्थांनी पायल ला चाळीसगाव येथे तीन खासगी हॉस्पिटलमध्ये फिरविले मात्र नियतीला ते मान्य नसल्याने अखेर पायल चा चाळीसगाव येथील देवरे हॉस्पिटलमध्ये तिची प्राण ज्योत मालवली.

तेथून तिचे ट्रामा केअर रुग्णालयात शवविच्छेदन केले. अपघातस्थळी नगरदेवळा औटपोस्ट चे विनोद पाटील,मनोहर पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला बाबत नगरदेवळा औटपोस्ट ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
तेजस महेर हा आयुष करियर अकॅडमीचा विद्यार्थी

  • कन्नड तालुक्यातील पांगरे गावाचा रहिवाशी तेजस महेर हा जळगाव येथील आयुष करियर अकॅडमीत शिक्षण घेत होता परंतू सध्या तो पंधरा दिवसांच्या सुट्टीवर घरी आलेला होता. तेजस हा शेतकरी कुटुंबातील असून आईवडील शेती काम करतात.
  • दोघे बहिणीचे आयुष करियर अकॅडमीत शिक्षण
  • जळगाव येथील शिवाजी नगर भागातील रहिवासी असलेले कैलास पवार यांना तीन मुली व एक मुलगा व पत्नी असा परिवार आहे. पायलचे वडील कैलास पवार। हे जळगाव येथे रेल्वे स्टेशनवर कँटीन चालावण्याचा व्यवसाय करतात. तर आई घरकाम करते. पायल ही घरात सर्वात मोठी होती तर तिची एक बहीण ती देखील आयुष करियर अकॅडमी येथे शिक्षण घेत आहे. तर लहान बहीण ही इयत्ता पाचवीत शिकत आहे तर भाऊ हा आठ वर्षाचा असून तो इयत्ता दुसरीत शिकत असल्याचे काका रमेश पवार यांनी सांगितले.
  • शेवटचे बोलणे झाले काकांशी
    पायलचे चाळीसगाव स्टेशनवरून काका रमेश पवार यांच्याशी संपर्क साधला आणि गाडी पाचोरा स्टेशनवर न थांबता मी चाळीसगाव स्टेशनवर उतरली आहे आता मी काय करू असे काकांशी शेवटचे बोलणे झाले होते. काका रमेश पवार देखील जळगाव येथे रेल्वे स्टेशनवर कँटीन चालवीत असतात.
    मेमु ट्रेनने केला घोळ
    सध्या सर्वसामान्यांची पॅसेंजर गाडी कोरोनामुळे बंद केली असल्याने मेमु ट्रेन सुरू केल्या आहेत. दरदिवशी भुसावळ इगतपुरी ही ट्रेन धावते ती सर्व स्टेशवर थांबते. तर भुसावळ- दौंड ही ट्रेन आठवड्यातून फक्त गुरुवारी धावते आणि ठराविक स्टेशनवर थांबते. दोघांची वेळ एकच असल्याने पायल भुसावळ – दौंड या मेमु ट्रेनमध्ये बसली आणि तिचा आजचा दिवस अखेरचा ठरला.
टीम झुंजार