संगमनेरमध्ये पती-पत्नीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची परिसरात खळबळ माजली आहे. ८ दिवसांपूर्वीच पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या त्यांच्या मुलाने आत्महत्या केली होती.
अहमदनगर :- जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे मुलांच्या मृत्यूनंतर ८ दिवसातच आई-वडिलांनी आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या पुण्यात शिकायला असलेल्या मुलाने ८ दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. या धक्क्यातून ते सावरले नाहीत. त्यांनीही गळफास घेत जीवन संपवलं. संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकात असलेल्या वाडेकर गल्लीत ही घटना घडली. पती-पत्नीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची परिसरात खळबळ माजली आहे.
८ दिवसांपूर्वीच पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या त्यांच्या मुलाने आत्महत्या केली होती तर विशेष म्हणजे २ वर्षापूर्वी त्यांच्या १६ वर्षीय मुलानेही आत्महत्या केली होती. यामुळे कुटूंबातील चार व्यक्तींनी आत्महत्या करून जीवन संपवलं असून दोन वर्षात संपूर्ण कुटूंब संपलं आहे.मच्छिंद्र वाडेकर आणि गौरी गणेश वाडेकर असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. ८ दिवसात वाडेकर कुटूंबातील तिघांनी आपली जीवनयात्रा संपवल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट घेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गणेश वाडेकर हे संगमनेर नगरपालिकेतून सेवानिवृत्त झाले होते. तर त्यांची पत्नी गौरी वाडेकर या आरोग्य विभागात कार्यरत होत्या. एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पती-पत्नीने आत्महत्या करण्याआधी दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या.
त्यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना या दोन चिठ्ठ्या मिळाल्या आहेत. वाडेकर यांच्या मुलाचा पुण्यात मृत्यू झाला होता, त्याच्या तपासकामात त्यांनी वाकड पोलिसांविषयी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी वाडेकर दाम्पत्याच्या अवघ्या १६ वर्षीय मुलानेही घरातच गळफास घेत आत्महत्या केली होती. तर, ८ दिवसांपूर्वी २१ वर्षीय मोठ्या मुलाने पुण्यात गळफास घेत आत्महत्या केली होती. आता त्यांच्या आई-वडिलांनीही आत्महत्या केली आहे. चार जणांच्या अख्ख्या कुटूंबाने जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४
- धुळे येथे ५०० महिला जय श्रीराम घोषणा देत एकाच वेळी आल्या मतदान केंद्रावर: महिलांची मते निर्णायक
- एरंडोल येथे आईच्या मृतदेह घरात, मुलाने केले मतदान: राष्ट्रीय कर्तव्य बजावून समाजाला दिला आदर्श.
- एक्झिट पोल २०२४: महाराष्ट्रातील ७ एक्झिट पोलमध्ये महायुती तर दोघांच्या सर्वेक्षणांमध्ये मते महाविकास आघाडीला बहुमत
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.१९ नोहेंबर २०२४