धक्कादायक! सोने, दागिने आणि कॅश असलेल्या व्यक्तीशी पहिल्यांदा मैत्री करायच्या अन् नंतर…. तीन सीरियल किलर महिलांनी चौघाना संपवलं;

Spread the love

गुंटूर (आंध्र प्रदेश) :- येथील तेनाली येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथी तीन महिलांना चार लोकांची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या चार लोकांची हत्या करण्यात आली ज्यामध्ये तीन महिला होत्या. या हत्या सायनाइड वापरून केल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये एक ४० वर्षीय मुंगप्पा रजिनी, ३२ वर्षीय मदीयाला वेंकटेश्वरी आणि ६० वर्षीय गुलरा रामनम्मा यांचा समावेळ आहे.

पोलिसांच्या तपासात खुलासा करण्यात आला आहे की या महिला सोने आणि दागिने आणि कॅश असलेल्या लोकांना आपला शिकार बनवत होत्या. या महिला पहिल्यांदा लोकांशी मैत्री करत असते, त्यानंतर सायनाइड मिसळलेलं पेय द्यायच्या. जेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यू होत असे या त्याच्याकडील सर्व मौल्यवान वस्तू घेऊन फरार होत. पोलिसांच्या तपासात यांनी आतापर्यंत चार लोकांची हत्या खेल्याचे समोर आले आहे. यामध्ये नागूर बी नावाच्या महिलेचा देखील समावेश आहे.

त्यांची हत्या याच वर्षी जूनमध्ये करण्यात आली होती. यासोबत या आरोपी महिलांना इतर दोन लोकांना मारण्याचा देखील प्रयत्न केला पण ते दोघे सुदैवाने बचावले.अटक करण्यात आलेल्या महिलांपैका मुख्य आरोपी मदीयाला वेंकटेश्वरी पहिल चार वर्ष वॉलेंटियर म्हणू काम करत होती. त्यानंतर ती कंबोडिया येते गेली, येथी ती सायबर गुन्हेगारीमध्ये सहभागी होती, पोलिसांनी महिलांकडून सायनाइड आणि अतर आवश्यक पुरावे गोळा केले आहेत.

यासोबत सायनाइड पुरवठा करणाऱ्या एका व्यक्तीला देखील अटक केली आहे.तेनाली येथील पोलिस अधीक्षक सतीश कुमार यांनी सांगितले की अटक केलेल्या महिलांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या महिलांविरोधात हत्या, चोरी, पुरवे नष्ट करणे, गुन्हेगारी कट रचने इत्यादी आरोपांसह गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार