व्यापार करण्यासाठी माहेरहून २ लाख आणले नाही म्हणून सासरच्या लोकांनी विवाहीतेला फाशी देऊन मारण्याच्या प्रयत्न; उपचारा दरम्यान विवाहितेचा मृत्यू

Spread the love

सोयगांव : माहेराहून २ लाख रुपये न आणल्याने २४ वर्षीय विवाहीतेला फाशी देऊन जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. यातून बचावलेल्या विवाहीतेचा मंगळवारी बनोटी (ता. सोयगांव) येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला.या प्रकरणी सासरच्या ६ जणांविरुद्ध गुन्ह दाखल करुन भडगाव (जि. जळगाव) येथील पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. नरिन मन्नान खाटीक (वय २४) असे मृत विवाहीतेचे नाव आहे. बनोटी येथील नरिन यांचा २०१९ ला कजगांव (जि. जळगाव) येथील मन्नान जाकिर खाटीक यांच्यासोबत लग्न झाले.

सासरच्या मंडळींना लग्नात मानपान दिला नाही म्हणून बकऱ्यांच्या व्यापारासाठी दोन लाख रुपयाची मागणी करीत शिवीगाळ आणि मारहाण करत माहेरी पाठवुन दिले होते. मात्र गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या मध्यस्थीने पुन्हा सासरी पाठवले. परंतु पती, सासू, नणंद, दीर, मावस बहीण, काका, सासरा यांच्याकडून छळ आणि पैशाची मागणी होतच राहीली. माहेरच्यांनी पैसे न दिल्याने मारहाण करीत दोरीने गळा आवळून मारण्याच प्रयत्न केला.

यामध्ये गंभीर दुखापत झालेल्या नैरीनला शेजारील मनोज टेलर आणि इतर लोकांनी चाळीसगाव येथे उपचारासाठी नेले. तेथून नाशिक येथे हलविले, मात्र तब्बेतीत सुधारणा होत नसल्याने बनोटी येथील घरी आणले असता मंगळवारी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी भाऊ अबरार खाटीक याने फिर्याद दिली आहे. पती मन्नान खाटीक, सासू रेहानाबी खाटीक, दिर तन्वीर खाटीक, मावस सासू शबाना खाटीक, नणंद सिमरन खाटीक, काका सासरा शाकिर खाटीक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार