राज्यवरील लोडशेडिंग टाळण्यासाठी ठाकरे सरकारने घेतला हा मोठा निर्णय

Spread the love

मुंबई : महाराष्ट्र राज्यावर सध्या कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज टंचाई व निर्मितीचे संकट आहे. या अनुषंगाने आज पार पडलेल्या राज्यमंत्री मंडळाच्या विशेष बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये राज्यावरील लोडशेडिंग टाळण्यासाठी आधीच्या करारापेक्षा वाढीव दराने वीज खरेदी करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला असून ती वीज गुजरात या राज्याकडून खरेदी करण्यात येणार आह

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत ऊर्जामंत्री नितीन राऊत. मंत्री छगन भुजबळहि उपस्थित होते. यावेळी बैठकीत वीजबिल दरवाढ संदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला. कोळशाच्या तुटवड्यामुळे अतिरिक्त वीज घ्यावी लागणार असल्याने तसेच राज्याच लोडशेडींग होवू नये. या विषयाच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली

लॉकडाउनच्या काळात सर्वसामान्यांना वाढीव वीज बिलाचा चांगलाच शॉक बसला. त्यामुळे वीज वितरण विरोधात राज्यभरात संतापाची लाटही पहायला मिळाली. दरम्यान वाढीव वीजबिल व आगामी काळात कोळशाच्या तुटवड्यामुळे निर्माण होणाऱ्या वीज टंचाईसंदर्भात आज महाराष्ट्र कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत गुजरात राज्याकडून वीज खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

टीम झुंजार