पुणे:- येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील एका बँकेच्या महिला व्यवस्थापकाने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेलं पावणे तीन कोटी रुपयांचं सोनं चोरल्याची घटना घडली आहे. बँकेच्या महिला व्यवस्थापकानेच हे सोनं चोरलं असल्याची माहिती समोर आली आहे . पुण्यातील पंजाब नॅशनल बँकेमध्ये हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी पुणे पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात पंजाब नॅशनल बँकेच्या महिला व्यवस्थापकाने बँकेच्या लॉकरमधून तब्बल पावणे तीन कोटी रुपयांचे सोने चोरलं. नयना अजवानी असे सोनं चोरलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या महिला व्यवस्थापकाचे नाव आहे. पुण्यातील सोपान बाग परिसरात राहणाऱ्या एका ४९ वर्षीय नागरिकांने कॅम्प परिसरात असलेल्या आरोरा टावर येथील पंजाब नॅशनल बँकेतील लॉकरमध्ये पावणेतीन कोटी रुपयांचे सोनं लॉकरमध्ये ठेवले होते. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
बँकेची महिला व्यवस्थापक नयना अजवानीने बँकेच्या लॉकरमधील सोनं चोरले. हे सोनं नयना अजवानी, सुरेंद्र शहानी यांनी चोरून ज्वेलर्स सतीश पंजाबी यांच्या दुकानात वितळवले. या चोरी प्रकरणी पुण्याच्या लष्कर पोलिस ठाण्यामध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापिका नयना अजवानी, सुरेंद्र शहाणी आणि ज्वेलर सतीश पंजाबी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहे.