मतदार संघाच्या विकासासाठी पक्षांतर -आमदार चिमणराव पाटील;पारोळ्यात शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकारी मेळावा

Spread the love

 

प्रतिनिधी | पारोळा
एरंडोल विधानसभा मतदारसंघाचा खुंटलेल्या विकासाला चालना मिळावी त्याचा विकास व्हावा या उद्देशाने पक्षांतर केले. परिणाम स्वरूप एरंडोल विधानसभा मतदारसंघाला अवघ्या अडीच वर्षात जवळपास 2500 कोटी रुपयांचे विकासकामे  मिळाल्याने पक्षांतराचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले असल्याची भावना आमदार चिमणराव पाटील यांनी व्यक्त केली. विजया लॉन्स येथे शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, आजी माजी सरपंच विविध पदाधिकारी यांचा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा घेण्यात आला. प्रसंगी आमदार  चिमणराव पाटील हे बोलत होते.

जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष  अमोल पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील युवा जिल्हाप्रमुख प्रा मनोज पाटील, शालिक गायकवाड, विजय पाटील सह विविध मान्यवर प्रमुख म्हणून उपस्थित होते.. या बैठकीचे सुत्रसंचलन कुणाल महाजन यांनी केले, शिवसेना सोशल मिडिया विभागाचे प्रमुख योगेश्वर पुरोहीत यांनी निवडणुकीत सोशल मीडिया चे स्थान व महत्व पटवून दिले. जिल्हा बँक उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी  प्रस्तावना करतांना बुथ स्तरावर करावयाचे नियोजन, एरंडोल विधानसभेत सुरू असलेल्या विकासकामांचा लेखाजोखा, महायुती सरकारने महिला, युवक, शेतकरी, जेष्ठ नागरिक यांच्यासाठी सुरू केलेल्या विविध योजना यांसह अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. या बैठकीला राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी दुरध्वनीव्दारे संबोधित केले.

यांची झाली नियुक्ती

यासमयी एरंडोल विधानसभेच्या महायुतीच्या समन्वयकपदी ज्ञानेश्वर आमले, एरंडोल शहरप्रमुखपदी एरंडोल नगरपरिषदेचे माजी.नगरसेवक नितीन चैत्राम चौधरी (बबलु पहेलवान), एरंडोल शहरप्रमुख (पुराभाग)  अतुल सुभाष मराठे, मागासवर्गीय सेनेचे शहरप्रमुख अमोल किशोर तंबोली, पारोळा युवासेनेचा शहरप्रमुखपदी अमोल मराठे यांची नियुक्ति करण्यात आली.

यांच्या झाला पक्ष प्रवेश

आमदार  चिमणराव पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गालापुर येथील सचिन महाजन, वनकोठे प्रकाश बोरसे, एरंडोल येथील पंकज चौधरी, उत्राण माजी.सरपंच राजु पाटील, चोरवडचे  उपसरपंच विजय  पाटील, माजी.उपसरपंच निंबा रतन पाटील,  किरण जिजाबराव पाटील यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले. यावेळी युवासेना, महिला आघाडी व इतर आघाडींचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सोसायटींचे आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, प्रत्येक गावातील बुथचे बुथप्रमुख, शिवदुत, सदस्य व मोठ्या संख्येने माता-भगिणी व प्रत्येक गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्य संपादक संजय चौधरी