प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेलेल्या प्रियकरास प्रेयसीच्या नातेवाईकांनी लाथा-बुक्क्यांनी व काठीने केली बेदम मारहाण,त्याच्या उपचारादरम्यान मृत्यू

Spread the love

साक्री :- प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाची हत्या झाल्याची घटना धुळ्यामधील साक्री तालुक्यातील निजामपूर जैताने येथे घडली आहे. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात चार संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान मयत अजय भवरे या तरुणाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. निजामपूर जैताने येथील अजय भवरे हा तरुण आपल्या प्रेयसीला तिच्या घरी भेटायला गेला होता. सदर प्रकार मुलीच्या घरच्या लोकांना लक्षात येताच त्यांनी त्याची विचारपूस केली.

त्यानंतर अजय भवरेला प्रेयसीच्या नातेवाईकांनी लाथा-बुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली.या मारहाणीत अजय भवरे हा बेशुद्ध झाला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांना बोलवून घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी अजय भवरे याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.याप्रकरणी अजय भवरे याच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर अजय भवरेच्या कुटुंबियांनी व नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता.पोलिसांनी अजय भवरे यांच्या कुटुंबियांची समजूत काढून आपण चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन देखील पोलिसांनी दिलं आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी