जामनेर न्यायालयात लोक न्यायालयाचे आयोजन/एकूण ९८१ प्रकरणे निकाली

Spread the love

 

जामनेर (प्रतिनिधी):- दिनांक २८ रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय, क.स्तर जामनेर येथे, तालुका विधी सेवा समिती जामनेर मार्फत लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. सदर लोक न्यायालयात यापुर्वी दाखल प्रलंबित प्रकरणे तसेच दाखल पुर्व प्रकरणे देखिल ठेवण्यात आली होती. सदर लोक अदालतीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षकारांनी सहभाग नोंदविला.लोक अदालत सुरू होण्यापुर्वी उपस्थित पक्षकार यांचेकरिता विधी सेवा समिती जामनेर मार्फत, विधी सेवा शिबीर कार्यक्रम आयोजीत करणेत आला.सदर शिबीरात लोक न्यायालयाचे महत्व आणि फायदे सांगण्यात आले.पक्षकारांना हा लोक न्यायालयाचा मार्ग सुखकर वाटला आणि प्रचंड प्रमाणात उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

सदर कार्यक्रमास मा.दि.न. चामले व मा.बी एम काळे यांनी अनमोल मार्गदर्शन केले. सदर वेळी मा.पी. व्ही. सुर्यवंशी यांनी देखिल सहकार्य केले.
न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांतुन, एकुण १५६ प्रकरणे निकाली निघाली तर, वादपुर्व प्रकरणांत बँका, पतसंस्था, महाराष्ट रा. विद्युत महामंडळ, बी.एस.एन.एल, ग्राम पंचायती, यांनी सहभाग नोंदविला होता. सदर लोक न्यायालयात एकुण ८२५ वादपुर्व प्रकरणे निकाली काढणेत आली.अशी एकुण ९८१ प्रकरणे निकाली काढण्यात आली.न्यायालयीन प्रलंबीत प्रकरणांतुन १९६४२८६ तर वाद पुर्व प्रकरणांतुन ३९००७२६ इतकी रक्कम वसुल झाली. अशी एकुण ५८६५०१२ इतक्या रक्कमेची तडजोड अंती वसुल करणेत आली.

न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांचे कौटुंबिक वादातील एकुण ६ प्रकरणांतील वैवाहिक वाद हा संपुष्ठात आला. सदर ६ महिला या त्यांचे पतीकडे नांदावयास गेल्या. प्रसंगी त्या सर्व सहा प्रकरणांतील पक्षकार महिला व
पुरुषांचा तालुका विधी सेवा समिती जामनेर मार्फत पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.
सदर लोक अदालत मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी मा.तालुका वकिल संघ, जामनेरचे सर्व सदस्य तसेच सरकारी वकिल अनिल सारस्वत, कृतीका भट यांचे सहकार्य लाभले. वकिल संघाचे अध्यक्ष वकील बी.एम.चौधरी, सचिव एम.बी.पाटिल, तसेच वकिल संघाचे सर्व मान्यवर विधीज्ञ, सर्व न्यायीक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक/कर्मचारी, बँका, पंचायत समिती यांनी सहभागी होवुन सर्वानी सहकार्य केले.

मुख्य संपादक संजय चौधरी