मुंबई :- राज्य सरकारने आज कॅबिनेट बैठकित एक मोठा निर्णय घेतला आहे. देशी गायींना राज्यमाता म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. सोमवारी कॅबिनेट बैठक बोलावण्यात आलेली असून या बैठकीमध्ये विधानसभेच्या तोंडावर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत.
राज्यातील देशी गायींना राज्यमाता-गोमाता म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायीच्या दुधाची मानवी उपयुक्तता,आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती, पंचगव्य उपचार, शेण गोमूत्र यांच्या सेंद्रिय शेतीतील महत्त्वाचे स्थान यामुळे देशी गायीबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.देशी गायींच्या बाबतीत सरकारने निर्णय जाहीर केला असून त्यामाध्यमातून गायींचं संवर्धन होणं ही अपेक्षा ठेवण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे देशी गायींच्या संबंधाने कोणते नियम असतील, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.