एरंडोल येथे वादग्रस्त विधान करणा-या समाजकंटकाविरोधात कारवाई करण्यात यावी,भाजपची मागणी.

Spread the love

एरंडोल येथे वादग्रस्त विधान करणा-या समाजकंटकाविरोधात कारवाई करण्यात यावी,भाजपची मागणी.

एरंडोल :- वादग्रस्त विधाने करून त्याचे सोशल मिडीयावर प्रसारण करणा-या आरिफ मिस्तरी यांचे विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप पदाधिका-यांनी पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिका-यांनी पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांची भेट घेवून निवेदन दिले. भाजपतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की शहरातील आरिफ मिस्तरी यांनी प्रक्षोभक वक्तव्य करून त्याचा व्ही.डी.ओ.करून सोशल मिडीयावर प्रसारीत करून दोन समाजात तेढ होईल असे कृत्य केले
आहे.सद्यस्थितीत शहर सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असून आरिफ मिस्तरी यांच्या वक्तव्यामुळे शहरातील शांतता धोक्यात येवून कायदा व सुव्यवस्थेची
परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.याबाबत पोलीस प्रशासनाने दखल घेवून दोन समाजात तेढ निर्माण करणा-या आरिफ मिस्तरी विरोधात कारवाई करावी
अन्यथा भाजपतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचे हस्ते पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष भिका कोळी,जिल्हा सरचिटणीसनिलेश परदेशी,तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,माजी उपनगराध्यक्ष योगेश महाजन,शेनापडू वाल्डे, अँड.मधुकर देशमुख,नरेश ठाकरे, ज्ञानेश्वर कंखरे,कल्पेश पाटील, संजय चौधरी, सदाशिव पाटील,सुरेश क्षिरसागर,दिगंबरपाटील, महेश पाटील,आनंद सूर्यवंशी,विजय सूर्यवंशी, देवेंद्र देशमुख यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

मुख्य संपादक संजय चौधरी