निंभोरा गावाजवळ रस्ता खचून खड्ड्यात दुचाकी अडकली ;-आई व मुलगा दोघे गंभीर
सोयगाव-.ता १.(साईदास पवार) वरठाण ते खडकदेवळा रस्त्याच्या दरम्यान असलेल्या निंभोरा गावाजवळील नलकांडी पुलाचा रस्ता खचून पडलेल्या खड्ड्यात पाचोरा कडून येणारी दुचाकी अडकून दोघे गंभीर झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास निंभोरा गावाजवळ घडली रोषन पाटील, बेबाबाई पाटील असे जखमी चे नाव असून वाहन संघर्ष समितीचे प्रवीण वाघ यांचेसह ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी ना मदत केली आहे.
निभोरा तालुक्यातील निभोरा गावाजवळ असलेल्या हा रस्तामधील नळकांडी पुलावर रस्ता खचून पाईप फुटल्याने मोठा खड्डा पडला हा खड्डा चुकविण्याच्या नादात एक दुचाकी स्लीप झाल्याने मुलगा व आई जखमी झाल्याची घटना घडली आहे दरम्यान पुलावरून वाहतूक ठप्प झाल्या ने पाचोरा आगाराच्या बनोटी कडे धावणाऱ्या बसेस मंगळवारी बंद करण्यात आल्या आहेत त्यामुळे वरठाण, बनोटी, वाडी,पळाशी,घोरकुंड आदी परीसरातील जवळपास दोनशे विद्यार्थी गोदेंगाव येथील सरस्वती भुवन प्रशालेत शिक्षण घेण्यासाठी ये जा करतात परंतु बसच बंद असल्याने ह्या विद्यार्थीचे शेक्षणिक नुकसान झाले आहे तसेच प्रवाशांची तारांबळ उडाली होती
बनोटी-पाचोरा रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली असुन ठीकठीकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत साईटपट्ट्या खोल गेलेल्या आहेत ह्या रस्त्यावर वाहने चालविणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखे आहे त्यातच रस्ता खराब असल्याने ह्या रस्त्यावर पावसाच्या पाणी साचल्याने जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत असुन काही ठीकाणी नळकांडी पुल बांधण्यात आले आहेत त्या ठिकाणी पाणी शिरल्याने निभोरा गावाजवळील काही अंतरावर असलेल्या नळकांडी पुलाचा रस्ता खचून पाईप फुटला असुन आजुबाजुला दोन खड्डे तर रस्त्याच्या मधोमध भला मोठा खड्डा पडल्याने मुलगा व आई दुचाकीवरून जात असताना खड्डा चुकवित असतांना पडल्याने जखमी झाले आहेत…