मन सुन्न करणारी घटना! बायको नांदायला येत नाही, पतीचे सासुरवाडी झालं भांडण रागात मेहुण्याचा 3 वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण करून बाळाला संपवलं.

Spread the love

मन सुन्न करणारी घटना! बायको नांदायला येत नाही, पतीचे सासुरवाडी झालं भांडण रागात मेहुण्याचा 3 वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण करून बाळाला संपवलं

श्रीरामपूर :- नवरा आपल्या सख्ख्या नात्यांवर उठेल याची पुसटशी कल्पनाही नव्हती आणि त्यातूनच भयानक कृत्य घडलं आहे. बायको नांदायला येत नाही म्हणून तरुणाला राग अनावर झाला. त्याने थेट सासुरवाडी गाठत मेहुण्याच्या ३ वर्षीय बाळाचं अपहरण केलं. इतक्यावरच न थांबता त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली.हत्येनंतर मृतदेह मक्याच्या शेतात नेऊन फेकला. तळपायाची आग मस्तकात जाईल अशी ही संतापजनक घटना श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव परिसरात घडली.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील पोलिसांनी या हत्येचं गूढ उकललं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली.राहुल बोधक असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तर स्नेहदीप असं हत्या झालेल्या बाळाचं नाव आहे. आपणच स्नेहदीपची हत्या केली, अशी कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेने श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा वैजापूर तालुक्यात रहिवासी आहे. सततच्या भांडणामुळे त्याची बायको श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे माहेरी निघून गेली होती.

ती परत नांदायला येत नसल्याने आरोपीला राग अनावर झाला. आठ दिवसांपूर्वी आरोपीने आपलं सासर गाठलं. तिथे मेव्हण्याशी (बायकोच्या भावाशी) वाद झाल्यानंतर त्याने ३ वर्षीय बाळाचं अपहरण केलं. यासंदर्भात ६ सप्टेंबर रोजी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी राहुल बोधक याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी वैजापूर तालुक्यातून आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने चिमुकल्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली.

मुख्य संपादक संजय चौधरी