धक्कादायक!माझ्या पत्नीची वर्तणूक चांगली नाही तिला वाईट सवय आहे, बायकोच्या हत्येनंतर पतीने केला पोलिसांना फोन.
भोगनीपूर (उत्तर प्रदेश ) :- आजकाल प्रेम प्रकरणाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकतर्फी प्रेमातून खून करणे, प्रेसयीच्या लग्नात अडथळा आणणं, विवाहित प्रेयसीचा किंवा तिच्या पतीचा खून करणं, अनैतिक संबंध असलेल्या पत्नीचा खून करणं अश्या धक्कादायक घटना घडत आहे. पत्नीच्या वाईट सवयींना कंटाळून एका पतीने तिचा बंदुकीच्या गोळ्या घालून खून केला. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने स्वत:च 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना याबाबत माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी गुरूवारी अटक केली आहे.
आरोपी पतीला कोर्टात हजर केल्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या भोगनीपूरमध्ये ही घटना घडली आहे.भोगनीपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अंजन कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुखराया येथील रहिवासी भगीरथ यादव लखनऊमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्याची पत्नी उषा यादव पुखरायामध्येच राहत होती. भगीरथ दर आठवड्याला सुट्टीच्या दिवशी गावी येत होता. भगीरथ सोमवारी लखनऊहून गावाला गेला होता. गावी गेल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की, भगीरथने परवाना असलेल्या बंदुकीने पत्नी उषावर गोळी झाडली.
पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपी भगीरथ यादव याला अटक केली.आरोपी भगीरथ यादवने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, त्याचं 2014 साली उषादेवीशी लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर तो पत्नीसह लखनऊमध्ये राहत होता. मात्र, पत्नीची वर्तणूक चांगली नव्हती. तिला वाईट सवयी होत्या. लखनौमध्ये तिचे अनैतिक संबंध होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर भगीरथने तिला पुखरायाला पाठवलं. पण, तरीही तिच्या वागण्यात सुधारणा झाली नाही. यामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. भगीरथच्या म्हणण्यानुसार, तिने त्याच्याशी अनेकदा भांडण केलं होतं आणि त्याला मारहाणही केली होती. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला होता. रागाच्याभरात त्याने तिला गोळ्या मारल्या.






