ग्रामसभेत निधीवाटपावरून ग्रामसभेत तुफान राडा; महिलांनी सरपंच महिलेस व तिच्या पतीस नागरिकांनी केली मारहाण.

Spread the love

ग्रामसभेत निधीवाटपावरून ग्रामसभेत तुफान राडा; महिलांनी सरपंच महिलेस व तिच्या पतीस नागरिकांनी केली मारहाण.

परभणी :- मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे.पालम तालुक्यातील उमरथडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत जोरदार राडा झाल्याची बातमी समोरआली आहे. यात निधीवाटपावरून दोन गटाच झालेल्या या राड्यात सरपंच महिलेसह तिच्या पतीलाही मारहाण करण्यात आली.या प्रकरारानंतर दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या असून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी उमरथडी येथील जिल्हा परिषद शाळा परिसरात ग्रामसभा भरवण्यात आली होती. पण सभा सुरू असताना काही जणांनी निधी वाटपावरून संरपंच महिला आणि विरोधी गटातील काही जणांमध्ये शाब्दिक चकमक झाली. पण हळूहळू हा वाद शिवीगाळपर्यंत पोहचला. या वादातून विरोधी गटातील काही महिला सदस्यांनी सरपंच संगीता पाथरकर आणि त्यांचे पती अच्युतराव पाथरकर यांना मारहाण केली.

या प्रकार इथेच थांबला नाहीत. ग्रामसभेत झालेल्या राड्यानंतर घरी जाणाऱ्या संरपच संगीत पाथरकर यांच्यावर पुन्हा गावातील महिलांनी त्यांची केस धरून मारहाण केली.या घटनेमुळे उमरथडी गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर याप्रकरणी सरपंच महिलेसह त्यांचे पती आणि त्यांच्या समर्थकांनी पोलीस गंगाखेड ठाण्यात तक्रार दाखल केली. तर विरोधी गटातील लोकांनीही सरपंचांविरोधा तक्रार दाखल केली.

मुख्य संपादक संजय चौधरी