कौटुंबिक कारणातून शिक्षिका पत्नी भांडी घासत असतांना पतीने तिच्या डोक्यात वरवंटा घालून केला निघृण खून.

Spread the love

कोल्हापूर :- मुरगूड ता.कागल जिल्हा कोल्हापूर येथील साई कॉलनीत राहणाऱ्या एका शिक्षकाने कौटुंबिक वादातून शिक्षक पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून केला. आज (दि. १) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. घटनेची मुरगूड पोलिसांत नोंद झाली आहे. पोलिसांनी शिक्षक पतीला घरातून ताब्यात घेतले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच असणाऱ्या साई कॉलनीत शिक्षक परशराम पांडुरंग लोकरे (वय ५३ ) व शिक्षिका सविता लोकरे (वय ४५) हे आपल्या अपूर्वाई बंगल्यात एक मुलगा व दोन मुली अशा कुटुंबासह राहात होते.

परशराम व त्यांची पत्नी सविता यांच्यात कौटुंबिक कारणातून वारंवार वाद होत होता. आज सकाळी चहापान सुरु असतानाच या दोघांत वाद सुरु झाला. यावेळी त्यांच्या मुलांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी वाद टोकाला गेला. यावेळी सविता भांडी घासण्यासाठी गेल्या असता परशराम यांनी वरवंटा घेऊन धावत जाऊन सविताच्या डोक्यात घातला. त्यांच्या डोक्यात वर्मी घाव बसल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. व जागीच ठार झाल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरगूड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख जयश्री देसाई यांनीही दुपारी घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती घेतली.

दरम्यान, यासंबंधी अपूर्वा परशराम लोकरे (वय २५ ) हिने आपल्या आईच्या या दुदैवी घटनेसंबंधी मुरगूड पोलिसांत फिर्याद दिली आहे. शिक्षक पती परशराम पांडुरंग लोकरे (वय ५३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मुलामुलींचा केला कौतुक सोहळा !

शिक्षक लोकरे कुटुंबातील मुलगी अपूर्वा ही नुकतीच सेट परीक्षा उत्तीर्ण झाली होती. तर मुलगा अनिरुद्ध याचे नुकतेच भारतीय नेव्हीसाठी निवड झाली होती. मुलांच्या कौतुका प्रित्यर्थ शिक्षिका सविता यांनी ४ दिवसांपूर्वी सर्वांना स्नेहभोजन देवून आनंद द्विगुणीत केला होता. त्यांची दुसरी मुलगी आसावरी पुणे येथे एमबीएचे शिक्षण घेत आहे. या घटनेनंतर या कौतुक सोहळ्याची सर्वत्र चर्चा व हळहळ व्यक्त होत आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी