VIDEO: लखनऊ : उत्तर प्रदेशातील पोलीसांचा भोंगळ कारभार सोशल मीडियावर समोर आला आहे. महत्वाच्या प्रकरणांकडे लक्ष देण्याऐवजी त्यांनी उगाचच रस्त्यालवर चालणाऱ्या दोन तरुण-तरुणीला गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड समजत मारलं.ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं.रस्त्यावर जेव्हा हा गोंधळ सुरु होता तेव्हा तेथील एका व्यक्तीने हा प्रकार आपल्या कॅमेरात कैद केला. व्हिडीओमध्ये तुम्ही हे स्पष्ट पाहू शकता की ती तरुणी हा मुलगा तिचा बॉयफ्रेंड नसून भाऊ असल्याचं सांगत आहे. पण पोलिस काही तिचं ऐकायला तयार नव्हते.
खरंतर असं बऱ्याचदा काही कपल पकडलं गेल्यावर आपण भाऊ-बहिण असतो असं सांगतात. पण बहुतांश वेळा ते फसवणूक करत असतात. पण यावेळी मात्र पोलिसांनी ज्यांना गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड समजून पकडलं ते भाऊ-बहिण होते. किरकोळ बाचाबाचीनंतर पोलिसांनी भावा-बहिणीला प्रियकर आणि प्रेयसी म्हणत मारहाण केली आणि नंतर कायद्याचा अवमान करत सर्व मर्यादा ओलांडल्या. हे प्रकरण व्हायरल होताच प्रशासन कारवाईत आले आणि स्पष्टीकरण दिले.हे प्रकरण रायबरेलीच्या सलून भागातील आहे. भाऊ-बहीण कुठेतरी जात असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, साध्या गणवेशातील पोलिस कर्मचाऱ्याशी काही कारणावरून वाद झाला. यानंतर कॉन्स्टेबलने भाऊ आणि बहिणीला मारहाण केली. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दोघांमध्ये वाद सुरू असून एक व्यक्ती त्या मुलाची मान धरून उभा आहे.
शेजारी उभी असलेली बहीण भावाला सोडण्यासाठी सतत विनवणी करत असते. दरम्यान, एक गणवेश घातलेला पोलीस तेथे पोहोचतो पण तोही त्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलीस कर्मचाऱ्याने भाऊ आणि बहिणीवर कारवाई करण्याची धमकी दिली तेव्हा हद्द झाली. या पोलिसांनी मुलाला तब्बल 24 तास बेकायदा ताब्यात ठेवल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. भावा-बहिणीला बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड म्हणत असभ्य वर्तन का केलं जात आहे. तसेच ते गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असले तरी पोलिसांना त्याचा त्रास का? असे सवाल उपस्थीत केले जात आहेत. ज्यामुळे लोक आता युपी पोलिसांना ट्रोल करत आहेत. ज्यानंतर प्रशासनाकडून या पोलीसांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.