पातरखेडा आश्रमशाळेत अमळनेर बीटस्तरिय क्रिडा स्पर्धाचे आयोजन…….!

Spread the love

एरंडोल :- क्रीडा क्षेत्रामुळे विद्यार्थ्यांचे जीवन बदलते अशी भावना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावलचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार साहेबांनी विद्यार्थ्यासमोर व्यक्त करत, खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. निर्णयक्षमता, सहानुभूती, शिस्त आणि सहकार्याची भावना निर्माण होते आणि गुणांच्या बळावर व्यक्ती कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो हे मोलाचे विचार त्यांनी व्यक्त केले. प्रसंग होता आश्रमशाळा पातरखेडा येथे अमळनेर बीट स्तरिय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाचा प्रसंगी ते बोलत होते.

आश्रमशाळा पातरखेडा येथिल क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते झाले प्रकल्प अधिकारी अरूण पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवनकुमार पाटील, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असे पातरखेडा आश्रमशाळेचे पालकत्व अधिकारी विश्वास गायकवाड, संस्थेचे सचिव विजय पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी पाटील, संचालक पदाधिकारी अजय शिवाजी पाटील, विविध आश्रमशाळेतुन उपस्थित असलेले मुख्याध्यापक क्रीडा शिक्षक विद्यार्थी व इतर मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते

सर्व खेळाडू आपले सर्व कौशल्य पणाला लावून खेळत होते व आयोजित आश्रमशाळेतर्फे सर्व खेळाडूना टि-शर्टचे वाटप करण्यात आले.हा क्रीडा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र जनार्दन तिरभाने प्राथमिक शिक्षक यांनी केले.

मुख्य संपादक संजय चौधरी