एरंडोल :-आमदार चिमणराव पाटील यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शहरात मंजूर झालेल्या सुमारे ७५ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण आज (ता.१०) व शुक्रवार (ता.११) करण्यात येणार आहे. आमदार चिमणराव पाटील यांचे हस्ते व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल
पाटील यांच्या उपस्थितीत भूमिपूजन व लोकार्पण करण्यात येणार असून कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.शहरातील विविध समाजाच्या पदाधिका-यांनी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांची भेट घेवून समाजासाठी सामाजिक सभागृहाची मागणी केली होती.
आमदार चिमणराव पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शहरातील विकासकामांसाठी सुमारे ७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत.शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस करण्यात येणार आहे.यामध्ये अंजनी नदीवर बांधण्यात आलेला पूल, कासोदा दरवाजा परिसरातील स्मशानभूमी,अमळनेर दरवाजा येथील
व्यायामशाळा,सावतामाळी व्यायामशाळा,गणेश कॉलनी येथील विपश्यना केंद्र,गांधीपुरा येथील स्मशानभूमी,सार्वजनिक उद्याने
सुशोभिकरण,पुस्तकांचा बगीचा,,वीर एकलव्य पुतळा सुशोभिकरण,सरस्वती कॉलनी येथील सभामंडप या पूर्ण झालेल्या विकासकामांचे लोकार्पण आमदार चिमणराव पाटील यांचे हस्ते व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांचे उपस्थितीत
करण्यात येणार आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज,महात्माफुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरणाचा शुभारंभ देखील करण्यात येणार आहे.नगरपालिका प्रशासकीय इमारत बांधकाम,नाट्यगृह बांधकामाचे भूमिपूजन,तसेच विठ्ठल मंदिर सभागृह बांधकाम,पाताळनगरी हनुमान मंदिर सामाजिक सभागृह,विविध रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण,भिल्ल समाज,पाटील
समाज,शिंपी समाज,चौधरी समाज,ब्राम्हण समाज,मणियार समाज,कुंभार समाज,राजपूत समाज,बडगुजर समाज,साळी समाज,लोहार समाज,मराठे समाज,पांचाळ समाज या समाजांच्या सामाजिक सभागृहांचे भूमिपूजन यावेळी करण्यात येणार आहे. यासह विविध चौकांचे सुशोभिकरण,धार्मिक स्थळांच्या सभामंडपाचे
भूमिपूजन यावेळी करण्यात येणार आहे.शहरातील विविध समाजासाठी सामाजिक सभागृह बांधकामासाठी निधी मंजूर झाला असून सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी
सांगितले.शहरात आयोजित करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या लोकार्पण कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.