एरंडोल :- नगरपरिषद येथे पुर्णवेळ नियमित मुख्याधिकारी नाहीत अतिरिक्त कार्यभार धरणगाव मुख्याधिकारी यांचे कडे आहे एवढेच नाही तर त्यांचे कडे जळगाव येथील ही चार्ज आहे त्यामुळे मुख्याधिकारी असून नसल्यासारखे आहे त्यामुळे रेग्युलर सीओ एरंडोल नगरपरिषदेला त्वरित मिळावेत अशी मागणी एरंडोल शहर संघर्ष समिती अध्यक्ष श्री रविंद्र लाळगे यांनी केली आहे.
एरंडोल नगरपरिषद येथे श्री. देशमुख यांची दोन महिन्यांपुर्वी मुख्याधिकारी पदी बदली ने नियुक्ती झाली ते हजर ही झाले मात्र एका महिन्यात च त्यांची येथून बदली करण्यात आली. त्यामुळे पुन्हा हा कार्यभार धरणगाव कडे वर्ग करण्यात आला.
म्हणून समाजमनाला हा प्रश्न निर्माण होतो की ,एका महिन्यात बदली का? बदली झाली काही हरकत नाही मात्र नवीन रेग्युलर मुख्याधिकारी का नाहीत. हे प्रश्न संभ्रम निर्माण करणारे आहेत. या प्रशासकीय बदली धोरणामुळे विविध विकासकामांवर परीणाम होत आहेत. कार्यालयात निर्णय घेण्यासाठी आधिकारी च नाहीत जे आहेत ते निर्णय घेऊन कामकाजात गती आणत नाहीत त्यामुळे बरेच कामे रेंगाळलेली आहेत. परिणामी नागरिक त्रस्त झालेले आहेत. दोन महिन्यांपुर्वी रस्ते कामाला सुरुवात करण्यात आली. एक महिन्या पासून काम बंद आहेत काही ठिकाणी रस्ते खोदून अर्धवट आहेत तर काही ठिकाणी अद्याप कामाला सुरुवात ही नाही पावसाळ्यात रस्ते चांगले असावेत अशी माफक अपेक्षा नगरपरिषद ला कर भरणार्यांची आहे मात्र पुर्ण पावसाळा नागरिकांनी अतोनात त्रास सहन करत काढला.
वाहने चालवणे तर अशक्य च होते मात्र पायी चालणे ही मुश्किल होते फक्त कर वसुली 100% मात्र कामात बेसुमार दुर्लक्ष करणारी ही एकमेव नगरपरिषद असावी. या प्रशासनाला काय म्हणावे? जी नगरपालिका साधे रस्ते सुद्धा सुस्थिती मध्ये ठेवू शकत नाही, नागरिकांना मुलभूत सुविधा पुरवू शकत नाही या नगरपरिषद क्षेत्रात नागरिकांनी का राहावे असा प्रश्न आहे .नागरी नवीन वसाहतीतील विविध समस्या आहेत नगरपरिषदेला पाहण्यासाठी व कृती कार्यक्रम तयार करण्यासाठी वेळ नाही.
अद्याप सांडपाण्यासाठी भुमिगत गटारी नाहीत, पथदिवे पुरेसे नाहीत त्यापैकी काही बंद आहेत, पाणी पुरवठा सहा दिवसातून एकदा होतो,त्यातही शुद्धता नाही, आठवडे बाजार रस्त्यावर भरतो. वैकुंठ भीम त स्वच्छता नाही असे विविध प्रश्न आहेत मात्र नगरपरिषदेला कोणी जबाबदार आधिकारीच नाहीत नागरिकांनी आपले गाऱ्हाणे कोणाला सांगावेत म्हणून संघर्ष समिती ची मागणी आहे की, शासनाने नियमित मुख्याधिकारींची नियुक्ती करावी अन्यथा संघर्ष समिती आक्रोश मोर्चा नगरपरिषदेवर ध नेणार आहे प्रशासनाने लवकरच याची दखल घ्यावी अशी मागणी संघर्ष समिती ने केली आहे.