अमळनेर तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकाने नैराश्येतून उचलले टोकाचे पाऊल; नदीत घेतली उडी.

Spread the love

अमळनेर :- तालुक्यातील पातोंडा येथील मूळ रहिवासी असलेलय सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकाने तापी नदी पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आजारपणाच्या नैराश्येतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.राजेंद्र रामदास लोहारे (वय ६१) असे मयत सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, बहिण असा परिवार आहे.

राजेंद्र लोहारे यांनी पातोंडापासून जवळच असलेल्या सावखेडा तापी नदी पुलावर गेले. येथे त्यांनी आपली दुचाकी उभी करून नदीत उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली. मात्र रात्री त्यांचा शोध लागला नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा शोध घेतला असता मुंगसे- दापोरी गावाच्या नदीकाठी त्यांचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. सदर आत्महत्या त्यांनी दीर्घ आजाराच्या नैराश्यतुन त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

मुख्य संपादक संजय चौधरी