नोकरीसाठी दोन लाखाची लाच प्रकरणी धरणगाव तालुक्यातील शाळेचा सचिव जळगाव एसीबीच्या जाळ्यात

Spread the love

धरणगाव | प्रतिनिधी :- शिपाई पदावर नोकरी लावण्यासाठी दहा लाखाची लाच मागितली पैकी दोन तात्काळ दोन लाख रुपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी पिंपरी खुर्द येथील शाळेच्या सचिवाला जळगाव एसीबींनी अटक केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विनोद मधुकर चौधरी वय 53 वर्ष शिव कॉलनी जळगाव असे आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार पिंपळकोठा खुर्द तालुका एरंडोल येथील रहिवासी असून त्यांचा मुलगा हा वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्था पिंपरीखोर तालुका धरणगाव जिल्हा जळगाव संचलित 20 टक्के शासकीय अनुदानित आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय बौद्ध खुर्द शिवार येथे 2021 पासून अनुसूचित जाती या प्रवर्गातील शिपाई पदावर नोकरीच होता त्यावेळी संशयित आरोपी व सचिवांनी सात लाख 70 हजार रुपये घेतले होते त्यानंतर तक्रारदार यांच्या मुला सचिव विनोद मधुकर चौधरी यांनी तक्रारदाराच्या मुलाला 2012 पासून कमी केले व ही जागा 2012 पासून रिक्त पद दाखवून त्या जागेवर तक्रारदार यांचा भाचा राजेश यास शिपाई पदावर नोकरी लावण्यासाठी शासनाकडून मंजुरी आणून देण्यासाठी तक्रारदाराकडे 15 ऑक्टोबर रोजी दहा लाख रुपये लाच मागितली व त्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली तात्काळ दोन लाख रुपये व शासनाकडून मंजुरी प्राप्त झाल्यावर तीन लाख रुपये व पगार सुरू झाल्यावर पाच लाख रुपये असे टप्प्याटप्प्याने दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली तसेच यापूर्वी दिलेले सात लाख 70 हजार रुपये विसरून जा असे सांगण्यात आले.

दहा लाखापैकी लाचेतील दोन लाख रुपये पहिला हप्ता म्हणून राहत्या घरी जळगाव स्वीकारताना आरोपी विनोद चौधरी यांना जळगाव एसीबीने ताब्यात घेत त्यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वी सापळा जळगाव एसीपीचे पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे दिनेश सिंग पाटील सुनील वानखेडे रमेश ठाकूर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

मुख्य संपादक संजय चौधरी