हैदराबाद :- मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील मणिकोंडा नगरपालिकेत डीईई (डेप्युटी एक्झिक्यूटिव्ह इंजिनिअर) पदावर असलेल्या एका महिला अधिकाऱ्यावर लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.सहसा लोक स्पाय कॅमेरा किंवा ऑफिसमध्ये लपलेल्या हिडन कॅमेराच्या मदतीने असे खुलासे करतात. मात्र दिव्यज्योती नावाच्या महिलेची पोलखोल तिच्याच पतीने केली आहे. एका व्हिडीओमध्ये पतीने आपल्याच पत्नी विरोधात पुरावे दाखवले जे धक्कादायक आहेत. रिपोर्टनुसार, श्रीपाद नावाच्या तरुणाने त्याची पत्नी दिव्यज्योती मणिकोंडा नगरपालिकेत काम करत असताना लाच घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे.
श्रीपादने मीडियाला पुरावा म्हणून एक व्हिडीओ दिला ज्यामध्ये त्याची पत्नी दररोज लाखो रुपयांची लाच घेऊन घरी येत असं सांगितलं. व्हिडिओमध्ये तो घराच्या कानाकोपऱ्यापासून ते देवघरापर्यंत ठेवलेले नोटींचे बंडल दाखवतो. काही ठिकाणी कपाटात नोटांचे बंडल अस्ताव्यस्त पडलेले आहेत तर काही ठिकाणी बॅगमध्ये पैसे ठेवले आहेत.श्रीपादने दावा केला की जेव्हाही तो त्याच्या पत्नीला तिच्या कामाबाबत विचारतो तेव्हा ती त्याचा अपमान करते. त्याला शिवीगाळ करते. भांडणाला वैतागून त्याने पत्नीचा पर्दाफाश करण्याचं ठरवलं. घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर, त्याने आपल्या पत्नीच्या बेकायदेशीर कृत्यांचा व्हिडीओ पुरावा म्हणून रेकॉर्ड केला आणि तो पुरावे माध्यमांना देखील दिला आहे. आता महिलेची सरकारी नोकरी धोक्यात येऊ शकते.