एरंडोल :- भूमिपुत्र फाउंडेशनच्या अध्यक्ष व मा जि प सदस्य श्री नानाभाऊ महाजन यांच्या 55वा वाढदिवस निमित्त खर्ची येथिल ग्रामस्थ व माध्यमिक विद्यालय खर्ची बु यांनी संयुक्त विद्यामानाने महा रक्तदान शिबिराच्या आयोजन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन सौ जयश्रीताई महाजन मा जि प सदस्य यांचा हस्ते झाले. कार्यक्रम प्रसंगी ताईसो तृप्ती नानाभाऊ महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात नानाभाऊ महाजन यांनी सालाबादप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजसेवेचा वसा असाच अविरत सुरू राहील असे मत ताईंनी व्यक्त केले .
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल माळी सर यांनी सविस्तर विचार मांडले. कार्यक्रम प्रसंगी उत्तम इंदा महाजन, नवल महाजन ,प्रकाश महाजन सर ,चैत्राम मराठे सर, माजी सरपंच गोपाल महाजन, संस्थेचे पदाधिकारी भूरा महाजन, विठ्ठल भाऊ महाजन ,पोलीस पाटील नाना महाजन, शांताराम महाजन, नामदेव चव्हाण, आप्पा म्हस्के, नाना सपकाळे ,प्रा योगेश महाजन सर, हिम्मत महाजन, सुभाष महाजन ,अरुण महाजन , उपसरपंच योगेश चव्हाण, संतोष अहिरे,विनोद मराठे, बापू गवळे,गणेश वाणी, भगवान महाजन व दगा महाजन या सर्व ज्येष्ठ मंडळींनी मोलाचे सहकार्य केले.
रक्तदान शिबिरासाठी गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय रक्तपेढी जळगाव येथील डॉ. नितीन भारंबे, डॉ. अविनाश खुडे व त्यांचे सहकारी यांनी रक्तगट चेक केले व रक्तदानाविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व भूमिपुत्र फाउंडेशनचे मकसूद पटेल ,टाकरखेडा उपसरपंच श्याम पाटील व प्रदीप देशमुख यांनी मेहनत घेतली