एरंडोल :- येथील अमळनेर दरवाजा परिसरातील छत्तीस वर्षीय युवकाने पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.याबाबत माहिती अशी,की शहरातील अमळनेर दरवाजा परिसरातील रहिवासी महेंद्र जगन्नाथ पाटील (वय-३६) याने आज पहाटे अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान सुमारास राहत्या घरातील पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली.पहाटे महेंद्र पाटील यांच्या आई त्यास उठविण्यासाठी गेल्या असता त्यांना महेंद्र याने पंख्याला रुमाल बांधून गळफास घेतल्याचे दिसून आले.त्यांनी जोरजोरात आरोळ्या मारून आक्रोश केला.
मयताचे वडील जगन्नाथ पाटील यांनी त्यांचा दुसरा मुलगा भास्कर पाटील यास घटनेची माहिती दिली.भास्कर पाटील परिसरातील नागरिकांनी महेंद्र पाटील यास खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात नेले असता तो मयत झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.याबाबत भास्कर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीसस्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सतीश गोराडे
यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.मयत भास्कर पाटील याचे पच्छात आई,वडील भाऊ असा परिवार आहे.सतत पडणा-या पावसामुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे महेंद्र पाटील दोन ते तीन दिवसांपासून अस्वस्थ असल्याचे परिसरातील नागरिकांनी
सांगितले.