अमळनेर तालुक्यात शेतीच्या वहिवाटीवरून झाला वाद एकावर विळ्याने वार त्याच्या कुटुंबास मारहाण ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

Spread the love

अमळनेर :- शेतीच्या वहिवाटीवरून असलेल्या वादातून एका कुटुंबाला ३५ जणांनी मारहाण तर एकावर विळ्याने वार केल्याची घटना १३ रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास एकतास गावाला घडली. जखमी उपचार घेऊन परत आल्यावर मारवड पोलीस स्टेशनला ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर तालुक्यातील एकतास येथील गोकुळ आनंदा बच्छाव आणि जयेश दुर्योधन वाघ यांच्या दोघांच्या शेतीची एकच वहिवाट असून त्याबाबत न्यायालयात वाद सुरू आहेत.

१३ रोजी सायंकाळी गोकुळ बच्छाव हे चुलत मामीची अंत्ययात्रा आटोपून परत येत असताना जयेश दुर्योधन वाघ ,दुर्योधन निंबा वाघ , भरत निंबा वाघ आले आणि त्याना मारहाण करू लागले. त्यावेळी जयेश याने विळ्याने मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला असता गोकुळ ने हातावर वार झेलून त्याच्या मधल्या बोटाला व अंगठ्याला जखम झाली. त्याचवेळी विजय आधार वाघ ,ज्ञानेश्वर आधार वाघ , गुणवंत संजय वाघ यांनी देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सुरेश आसाराम वाघ ,देविदास आसाराम वाघ , अधिकार आसाराम वाघ , संजय आसाराम वाघ ,दीपक अधिकार वाघ हे प्रोत्साहन देत होते की याला सोडू नका मागच्या केस मध्ये याने खूप त्रास दिला आहे.

हे पाहून योगेश शिवाजी वाघ , आत्माराम राजाराम वाघ , भटू आत्माराम वाघ ,गोलू आत्माराम वाघ , साहेबराव चिंधा वाघ , सतीलाल अंकुश वाघ ,रतीलाल अंकुश वाघ , राज ज्ञानेश्वर वाघ , रोहिदास रुपचंद वाघ ,विलास उत्तम वाघ हे आले व यांनीही शिवीगाळ करत याला जिवंत सोडू नका असे सांगत होते. काही लोकांनी माझी सुटका केली. भांडणाचे वृत्त कळताच माझ्या मुली भांडणाच्या ठिकाणी येत होत्या. त्यांना सुनंदा सुरेश वाघ , मंगलाबाई देविदास वाघ , विजया अधिकार वाघ , कल्पना संजय वाघ, मंगलाबाई साहेबराव वाघ , रंजना विजय वाघ ,सुरेखा ज्ञानेश्वर वाघ , आशा सतीलाल वाघ , सुनंदा रतीलाल वाघ , प्रतीक्षा भरत वाघ ,अनिता भरत वाघ , योगिता दुर्योधन वाघ, पूजा दुर्योधन वाघ यांनी घराकडे जाऊन पत्नीला शिवीगाळ आणि मुलींना मारहाण केली.

गोकुळ याना पोलिसांच्या गाडीत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना धुळे येथील हिरे वैद्यकीय रुग्णालयात १०८ दाखल करण्यात आले.उपचार घेऊन परत आल्यावर २१ रोजी गोकुळ बच्छाव यांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून ३५ जणाविरुद्ध दंगल ,मारहाण ,चिथावणी देणे, जखमी करणे या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल सचिन निकम करीत आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी