एरंडोल :- एरंडोल विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील दिनांक २९ ऑक्टोंबर मंगळवार रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.यावेळी महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.सकाळी दहा वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मेळाव्यास महायुतीचे वरिष्ठ नेते मंत्री ना. गिरीश महाजन, ना. गुलाबराव पाटील, ना. अनिल पाटील, आ. चिमणराव पाटील, खा. स्मिता वाघ, भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर, अजित पवार गट जिल्हा अध्यक्ष संजय पवार, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख मनोज पाटील उपस्थित राहणार आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापासून महात्मा फुले पुतळा,अमळनेर दरवाजा,विठ्ठल मंदिर,पांडव वाडा,भोई गल्ली,भगवा चौक,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बुधवार दरवाजा, मरीमाता मंदिर,धरणगाव चौफुली बस स्टँड, फुले- आंबेडकर व्यापारी संकुल येथे या मार्गाने काढून शिवसेनेचे उमेदवार जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील अर्ज दाखल करणार आहेत. तसेच फुले- आंबेडकर व्यापारी संकुल येथे या ठिकाणी जाहीर सभेच्या आयोजन करण्यात आले आहे.
मतदारसंघातील भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन पक्ष आठवले गट यासह मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल प्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन महायुतीच्या पदाधिका-यांनी केले आहे.