शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी जिल्हापरिषद सदय नानाभाऊ महाजन यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, महाविकास आघाडीत बंडखोरी.

Oplus_131072
Spread the love

एरंडोल :- एरंडोल विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन यांनी आज शक्तीप्रदर्शन करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे.नाना महाजन उमेदवारी कायम ठेवतात की माघार घेतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.एरंडोल विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीअंतर्गत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी सोडण्यात आल्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.एरंडोल विधानसभा मतदार संघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा असतांना पक्ष नेतृत्वाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार न करता मित्र पक्षासाठी मतदारसंघ सोडल्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे नाना महाजन यांनी सांगितले.दरम्यान नाना महाजन यांनी आज सकाळी अकरा वाजता
महात्मा फुले पुतळ्यापासून जोरदार शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी ‘भूमिपुत्र नाना महाजन’ असे घोषवाक्य लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या.तसेच कार्यकर्ते विविध घोषणा दते होते.रॅलीत महिला,युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मुख्य संपादक संजय चौधरी