एरंडोल :- विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवारी करणारे पारोळा येथील डॉ.संभाजीराजे पाटील यांनी गेल्या 2 ते 3 वर्षांपासून मतदार संघात चांगला संपर्क ठेवला आहे.त्यांनी मतदार संघातील दोन तालुके व एका जिल्हापरिषद गटात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून पारोळा येथे वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे व त्यालाच समाजसेवा समजणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना ओळखले जाते.
त्याच बरोबर त्यांचे वैद्यकीय व्यवसाय कमी व सामाजिक कार्य जास्त असल्यामुळे.त्यांना खुप आधी पासून समाज सेवेची आवड होती त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात अनेक महत्वपूर्ण शिबिर घेऊन गरजूंना मोफत आरोग्य सेवा पुरविल्या आहेत गेल्या 2 ते 3 वर्षात त्यांनी मतदार संघात अनेक ठिकाणी रुग्णाचे मोफत डोळे तपासणी शिबिर घेऊन त्यांचा मोफत इलाज करून दिला.
अनेक रुग्णांनी त्यांनी वैयक्तिक रित्या मदत केली.त्यांनी आपली उमेदवारी ही मतदार संघात असलेल्या रोजगाराच्या समस्या, सिंचनाच्या समस्या,गावागावात रस्ते, गटारी, स्वच्छतेच्या सुविधा, आरोग्याच्या सुविधा तसेच अशा अनेक बाबींच्या बाबतीत मतदार संघाचे काम करण्यासाठी केली आहे.मतदार संघात त्यांना वाढता पाठिंबा बघता विजय निश्चितच त्यांचाच होणार असल्याचे बोलले जात आहे.डॉ.संभाजी पाटील यांचे सरकार दरबारी देखील चांगली ओळख असल्याने याचा फायदा मतदार संघाला होणार असल्याचे देखील बोलले जात आहे.त्यांचा मतदार संघाबाबत चांगलाच अभ्यास झाल्याचे देखील त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरून दिसून येते.दरम्यान यावेळेस मतदार संघात बदल होणार हे देखील तेव्हढेच खरे आहे.नवा चेहरा मतदार संघात निवडून येणार असल्याचे मतदरांमधून बोलले जात आहे.