सामान्य निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक पहाटेच घटनास्थळी दाखल
जळगाव दि. 18 ( माध्यम कक्ष ) जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसेन यांच्या घरावर अज्ञाताकडून पहाटे 4 वाजता गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. निवडणूक विभागाचे सामान्य निरीक्षक, सामान्य पोलीस निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्या घटनेची सखोल चौकशी होत आहे.
अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसेन यांच्या पहाटे चार च्या सुमारास ते झोपलेले असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यांनी एक मोठा आवाज ऐकला आणि तपासणी केल्यावर त्यांना दिसले की काचेच्या खिडकीचा चक्काचूर झाला आहे आणि गोळ्यांचे छिद्र सापडले आहेत.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि चौकशी केली असता रस्त्यावर तीन रिकामी काडतुसे आढळून आली. झडतीदरम्यान खोलीत एक गोळी सापडली. खोलीचा शोध सुरू आहे.
शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन हे AIMIM चे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांना अधिकृत मिळाली नसल्यामुळे ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. या घटनेबाबत त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. सीसीटीव्ही फुटेजचा आढावा घेतला जात असून पहाटे ३:४२ वाजता त्याच्या घराजवळ एक मोटारसायकल आढळून आली.
त्या संदर्भातील पुढील तपास पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.