बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.

Spread the love

कन्नड :- राज्यात एकाच टप्प्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी काल पार पडली. लोकसभा निवडणुकीत फटका बसलेल्या महायुतीने विधानसभा निवडणुकीत मात्र जोरदार मुसंडी मारली आहे.महायुतीला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तब्बल 230 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. 132 जागांसह भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागांवर विजय मिळाला आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचा राज्यात मोठा पराभव झाला आहे. मविआला केवळ 45 जागाच मिळाल्या आहेत.यातच

कन्नड विधानसभा मतदार संघात धक्कादायक निकाल लागला आहे. या निकालात एका बायकोनेच नवऱ्याला धोबीपछाड देत विजय मिळवला आहे. भापजचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांची कन्या रंजना जाधव विजयी ठरल्या आहेत.तर त्यांचे विभक्त पती हर्षवर्धन जाधव हे 18 हजार मतांनी पराभूत झाले आहे. या निकालाची सर्वत्र चर्चा आहे.

कन्नड विधानसभा मतदार संघात शिंदेंच्या शिवसेनेने रंजना जाधव, उद्धव ठाकरेच्या शिवसेनेकडून उदयसिंह राजपूत आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यात तिरंगी लढत होती. या लढतीत थेट लढत ही जाधव नवरा बायकोमध्येच होती. दरम्यान एका सभेत रंजना जाधव या ढसाढसा रडल्या होत्या. माझ्या वडिलांवर वाटेल तसे आरोप झाले पण आम्ही ते सहन केले. कारण लेकीच्या बापाने ते आरोप सहन करायचे असतात, असं म्हणत विभक्त पती हर्षवर्धन जाधव यांनी कसा अन्याय केला हे रंजना जाधव यांनी सांगितलं होतं. निवडणुकीच्या निकालात रंजना जाधव यांना 84 हजार 492 मतं पडली होती. तर विभक्त पती हर्षवर्धन जाधव यांना 66 हजार मतं पडली होती. त्यामुळे रंजना जाधव यांनी विभक्त पती हर्षवर्धन जाधव यांचा 18 हजार 201 मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे या निकालाची चर्चा आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी