दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.

Spread the love

एरंडोल :- गोवंश व गाईंची अवैधरीत्या वाहतूक करणारे दोन वाहने व त्यामध्ये असलेल्या दोन गायी व तीन गोवंश असा सुमारे सव्वा तीन लाख रुपयांचा माल जप्त केला.याबाबत दोन्ही वाहन चालकां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त करण्यात असून गायी व गोवंश यांना धरणगाव येथील कामधेनु गोसेवा मंडळ यामध्ये जमा दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी,की काल रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास राहुल राजू महाजन,किरण पाटील, गोपाल महाजन,सागर महाजन,हर्शल बिर्ला हे म्हसावद
नाक्यावरील एका चहाच्या दुकानावर चहा घेत होते.त्यावेळी त्यांना एमएच १४ एचजी ९८२७ व एमएच २० जीसी ६२६१ हि दोन वाहने म्हसावदकडे भरधाव वेगाने जात असल्याचे दिसून आले.सदर वाहनांमधून गुरांचा आवाज येत असल्यामुळे त्यांनी वाहनांचा पाठलाग करून ते थांबवले.एका वाहनात दोन गायी व दुस-या वाहनात तीन गोवंश साब्शायास्पद स्थितीत बांधलेले आढळून आले.वाहन थांबवल्यानंतर वाहन चालकांकडे गुरांबाबत माहिती विचारली असता सदरची गुरे नेरी (ता.जामनेर) येथे बाजारात विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले.वाहनचालकांकडे गुरे वाहतुकीचा परवाना व कागदपत्रांची मागणी केली
असता ते उडवाउडवीचे उत्तरे देत असल्यामुळे युवकांचा संशय बळावला व त्यांनी गुरांसह वाहने पोलीसस्थानकात आणली. याबाबत राहुल महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाहन क्रमांक एमएच१४ एचजी ९८२७ चा चालक लखन विजय पाटील रा.राजपूर (मध्यप्रदेश) व त्याचा सहाय्यक ललित सीताराम भोई रा.क्रांतीनगर, शिरपूर व एम.एच.२० जीसी ६२६१ चा चालक शंकर सीताराम शिंदे रा.म्हादनी ता.सिल्लोड,व त्याचा सहाय्यक विजय साहेबराव सपकाळ रा,म्हाडा कॉलनी,भोकरदन यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत.वाहनांमधील गायी व गोवंश यांची रवानगी धरणगाव येथील कामधेनु गोसेवा मंडळ येथे करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष चौधरी तपास करीत आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी