गोंदिया :- आज शुक्रवारी बस अपघाताची धक्कादायक घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात 7 महिलांसह एकूण 11 जणांचा मृत्यू झाला. तर 20 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचं समजते.यामध्ये काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस (MH01 EM 1273) भंडाऱ्याहून गोंदियाला निघाली होती. बस दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास खजरी गावानजीक पलटी झाली. दुचाकीस्वार अचानक बसच्या समोर आल्यानं हा भयानक अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस (MH01 EM 1273) भंडाऱ्याहून गोंदियाला निघाली होती. बस दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास खजरी गावानजीक पलटी झाली. दुचाकीस्वार अचानक बसच्या समोर आल्यानं हा भयानक अपघात झाला. या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचा ताबा सुटला आणि बस रेलिंगला धडकली. हा अपघात घडल्यानंतर बस चालकाने पळ काढला.या अपघातात जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे.
शिवशाही बस अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू
1) स्मिता सूर्यवंशी (32) रा. मोरगाव अर्जुनी (पोलीस कर्मचारी)
2) मंगला राजेश लांजेवार (60) राहणार पिपरी जिल्हा भंडारा
3) राजेश देवराम लांजेवार राहणार पिपरी जिल्हा भंडारा
4) कल्पना रविशंकर वानखेडे (65) राहणार वरोरा जिल्हा चंद्रपूर..
5) रामचंद्र कनोजे (65) राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा..
6) अंजिरा रामचंद्र रामचंद्र कनोजे (60) राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा
7) आरिफ अजहर सय्यद (42) राहणार घोटी गोरेगाव गोंदिया
8) अजहर अली सय्यद (55) राहणार घोटी गोरेगाव गोंदिया
9) नयना विशाल मिटकरी (35) राहणार बेसा जिल्हा नागपूर
10) अनोळखी पुरुष
11) अनोळखी पुरुष
मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत
दरम्यान या अपघाताचे वृत्त समजताच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताबद्दल स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली आहे. तसेच जखमी लोकांवर तातडीने आणि योग्य उपचार करावेत, अशा सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत. त्यासोबतच मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश देखील एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत, असे त्यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीसांकडून मृतांना श्रद्धांजली
गोंदियातील शिवशाही बसचा दुर्दैवी अपघाताची बातमी समजतात आता राजकीय वर्तुळातूनही हळहळ व्यक्त केली आहे. या अपघाताबद्दल आता देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त करत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनीनजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलविण्याची व्यवस्था करा, असेही मी गोंदियाच्या जिल्हाधिकार्यांना सांगितले आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, ते मदतकार्यासाठी समन्वय करीत आहेत. या घटनेतील जखमींना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असे देवेंद्र फडणवीस यांनी एका पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.