एरंडोल :- येथील पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने देशभरातील लाखो हिंदू व मुस्लीम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या नथ्थूबापुंनाउरुसानिमित्त भव्य मिरवणूक काढून भगवी चादर चढवण्यातआली.पांडववाड्यापासून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हजारो युवक सहभागी झाले होते.पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने बारा वर्षांपासून नथ्थूबापुंना मानाची भगवी चादर चढवण्यात येत आहे.देशभरातील लाखो हिंदू व मुस्लीम समाजातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नथ्थूबापूंच्या उरुसाला २९ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला आहे.पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने पांडववाड्याजवळील हनुमान मंदिरात समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,पांडववाडा संघर्ष समितीचे प्रमुख प्रसाद दंडवते,कुणाल महाजन,सिद्धार्थ परदेशी यांचेसह मान्यवरांच्या हस्ते आरती करून मिरवणुकीस
सुरुवात करण्यात आली.पांडववाडा,मारवाडी गल्ली,भगवा चौक,मेनरोड या मार्गाने मिरवणूक नेण्यात आली.मिरवणुकीत हजारो युवक शिस्तबद्ध पद्धतीने लेझीम खेळत होते.तसेच मिरवणुकीवर ठिकठीकाणी कागदी पाकळ्यांचा वर्षाव
करण्यात आला.मेनरोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताच युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली.मिरवणुकीतील नथ्थूबापूंची आकर्षक सजावट केलेली प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवकांनी पांडवनगरी असा उल्लेख असलेल्या भगव्या टोप्या
परिधान केल्या होत्या.मिरवणुकीत युवकांनी विविध घोषणा देवून परिसर दणाणून सोडला.माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन,ट्रस्टचे संचालक जावेद मुजावर, सुनिल चौधरी,सुभाष पाटील, माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी यांचेसह विविध हिंदू संघटनांचे
पदाधिक-यांच्या हस्ते नथ्थूबापुंना भगवी चादर चढवण्यात आली.यावेळी युवकांनी मोठा जल्लोष केला.पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कुणाल महाजन,उत्सव समितीचे अध्यक्ष वैभव पाटील,उपाध्यक्ष मुन्ना महाले,बंटी ठाकूर,कल्पेश शिंपी,मयूर बिर्ला, भोला पवार,भूषण चौधरी,प्रकाश पाटील,रोहिदास महाजन,नितीन बोरसे,भुरा पाटील,कौस्तुभ मानुधने,उमेश साळी,बजरंग वाणी,भावेश तिवारी,भूषण सोनार यांचेसह पदाधिका-यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.मिरवणूक शांततेत पार पडली.पोलीस निरीक्षक
सतीश गोराडे,सहाय्यक निरीक्षक गोविंद पवार यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस,राखीव पोलीस दल व गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दरम्यान नथ्थूबापू यांच्या उरुसानिमित्त देशभरातील हजारो भाविक नवस फेडण्यासाठी नथ्थूबापूंच्या दर्शनासाठी येत आहेत.उरुसानिमित्त
संसारोपयोगी विविध वस्तूंची दुकाने थाटण्यात आली असून भव्य पालान्यांसह विविध करमणुकीच्या साधनांचा आनंद भाविक लुटत आहेत.
भगव्या चादर मिरवणुकीतील प्रभू श्रीराम यांचे छायाचित्र असलेले भगवे ध्वज,स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेले फलक,विविध घोषवाक्य लिहिलेले फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
मिरवणुकीत गुलालाऐवजी कागदी पाकळ्यांचा वापर.
मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवकांनी परिधान केलेल्या भगव्या टोप्या व भगवे ध्वज मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले.