मुंबई :- अंबरनाथमध्ये एका शिक्षकाने आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यांचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी शिक्षकाला पालकांच्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात तीन विद्यार्थ्यांसोबत या शिक्षकाने अशा प्रकारचा लज्जास्पद प्रकार केल्याचे समोर आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक लैंगिक शोषण करतानाचा व्हिडिओ काढून त्याआधारे या विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करीत होता. यामध्ये पीडित विद्यार्थी शाळेत जाण्यास तयार नसल्याने त्यांच्या पालकांनी या विद्यार्थ्यांना विश्वासात घेतले. यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, या घटनेने पालकवर्गात संतापाचे वातावरण आहे.एका सेवाभावी संस्थेच्या शाळेत शिक्षकाने अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. अंबरनाथ पश्चिमेच्या वांद्रापाडा परिसरात एका सेवाभावी संस्थेची शाळा आहे. या शाळेत परिसरातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात.
यातील काही अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत इथला शिक्षक अश्लील लैंगिक चाळे करत होता. तसंच या प्रकरणाचा व्हिडिओ तयार करून तो या मुलांना ब्लॅकमेल देखील करत होता. त्यामुळे घाबरलेल्या काही मुलांनी शाळेत जायला नकार दिल्यानंतर त्यांच्या पालकांनी चौकशी केली असता हा सगळा प्रकार उघड झाला आहे .याप्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या नराधम शिक्षकाविरोधात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला आज उल्हासनगर न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे.दरम्यान या प्रकरणामुळे अंबरनाथ शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
पीडित मुलांकडून तेल मालिश करतानाचे व्हिडिओ चित्रीकरण पोलीस तपासात समोर
नराधम शिक्षकाकडून वारंवार लैंगिक छळ होत असल्याने पीडित मुलांनी शाळेत जाणे बंद केलं होत.मुलं शाळेत का येत नाही म्हणून शाळा संचालकाने त्या मुलांच्या घरी जाऊन चौकशी असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. धक्कादायक बाब म्हणजे नराधम उघड्या अंगावर पीडित मुलांकडून तेल मालिश करतानाचे व्हिडिओ चित्रीकरण पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.
शिक्षकाला न्यायालयात हजर केले,तीन दिवसापर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान, पीडित मुलांच्या पालकांनी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाणे गाठत मुलांवर घडलेला प्रसंग कथन करताच, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलमांसह पोस्को कायदयानुसार गुन्हा दाखल करत नराधमाला काही तासातच अटक केली आहे. नराधम शिक्षकाला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.