डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एरंडोलला विविध कार्यक्रम.

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी

एरंडोल-येथील पंचशील मित्र मंडळ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.उत्सव समितीच्यावतीने मोटर सायकल rally,मिरवणूक काढण्यात आली.आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शहरातुन भव्य मिरवणूक काढण्यात आली.

डॉ.बाबासाहेब जयंती उत्सव समिती आणि पंचशील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येते.मात्र मागील दोन वर्षांपासून देशात कोरोनाचे संकट उभे राहिल्यामुळे जयंती अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत होती.यावर्षी कोरोनाची समस्या दूर झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला होता.

उत्सव समितीतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी,तहसीलदार सुचिता चव्हाण,औरंगाबाद येथील विक्री कर उपायुक्त आर.एस.पाटील,नगराध्यक्ष रमेश परदेशी,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,किशोर निंबाळकर,कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील,जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,प्राचार्य एन.ए.पाटील,माजी उपाध्यक्ष अशोक चौधरी यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमास बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे,निवृत्त तहसीलदार अरुण माळी,ज्येष्ठ पत्रकार प्रा.शिवाजीराव अहिरराव,भाजपचे तालुका सरचिटणीस अमोल जाधव,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शिंदे,सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष सचिन विसपुते,युवासेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन,माजी नगरसेवक डॉ.नरेंद्र पाटील,advt.नितीन महाजन,चिंतामण पाटील,advt.मधुकर देशमुख,पी.जी.चौधरी,प्रमोद महाजन,डॉ.के.ए.बोहरी,माजी उपनगराध्यक्ष जहिरोद्दिन शेख कासम,डॉ.फरहाज बोहरी,शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील,सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पवार,प्रा.नरेंद्र गायकवाड,प्रा.के.जे.वाघ,सहायाक पोलीस निरीक्षक शहर्द बागल,पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांचेसह राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी युवकांनी शहरातील प्रमुख रस्त्यावरून मोटरसायकल rally काढली.मोटर सायकलला लावलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले ध्वज rallyचे विशेष आकर्षण ठरले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.आमदार चिमणराव पाटील यांचेहस्ते डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून मिरवनिकीस प्रारंभ करण्यात आला.

टीम झुंजार