एरंडोल :- शास्त्री फाउंडेशन संचलित शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,पळासदड ता.एरंडोल येथे दि. 27 डिसेंबर रोजी इंडक्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ.विजय शास्त्री तसेच सचिव रूपा शास्त्री यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी केले. सदरील उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे संस्थापक डॉक्टर विजय शास्त्री, सचिव रूपा शास्त्री, उपप्राचार्य डॉ.पराग कुलकर्णी तसेच वरिष्ठ प्राध्यापक जावेद शेख उपस्थित होते. सदरील कार्यक्रमासाठी प्रथम वर्षात पदवी, पदविका तसेच थेट द्वितीय पदवी औषध निर्माणशास्त्र साठी प्रवेशित विद्यार्थी उपस्थित होते. सदरील विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर सदरील विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शैक्षणिक प्रमुख प्रा. राहुल बोरसे आणि प्रा. रोशनी पाटील मॅडम यांनी औषध निर्माण शास्त्र क्षेत्राशी संबंधित शैक्षणिक माहितीचा आढावा सांगितला तसेच परीक्षे संदर्भात प्रा. करण पावरा आणि प्रा. कीर्ती पाटील यांनी माहिती सांगितली. विद्यार्थ्यांमधून रिद्धी गुजर,पूजा चव्हाण व भाऊसाहेब पवार या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. विजय शास्त्री यांनी त्यांच्या शैक्षणिक जीवनातील काही प्रसंग विद्यार्थ्यांसमोर ठेवले. विद्यार्थी हाच आपल्या विकसित भारताचा कणा असतो असे महत्त्वाचे प्रतिपादन डॉ. विजय शास्त्री यांनी यावेळी केले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराचे नियोजन देखील केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा शिवदे व योगेश्वरी लोहार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. मंगेश पाटील यांनी केले. एकंदरीत कार्यक्रमाचे नियोजन उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी, प्रा. मंगेश पाटील, प्रा. राहुल बोरसे तसेच HOD जावेद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली केले गेले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.