एरंडोल :- येथील स्वामी समर्थ मंदिर परिसरातील रहिवासी आयुष गोविंद मालपुरे हा सी.ए.परीक्षा उत्तीर्ण झाला.आयुष मालपुरे याने वयाच्या २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त केले असून धरणगाव येथे वाणी समाजातर्फे त्याचा सत्कार करण्यात आला.श्रीकृपा जिनिंगचे व्यवस्थापक गोविंद मालपुरे
यांचा तो पुत्र आहे.आजोबा गोपाल मालपुरे यांनी शिक्षणासाठी दिलेले प्रोत्साहन आणि त्यांनी केलेले संस्कार यामुळेच यश प्राप्त केल्याचे त्यांनी सांगितले.नियमित अभ्यास,आत्मविश्वास असल्यास प्रत्येक क्षेत्रात यश मिळत असल्याचे त्याने सांगितले.वडील गोविंद मालपुरे यांचेसह काका बिपीन मालपुरे,रोषण मालपुरे यांनी त्यास मार्गदर्शन केले.विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिका-यांनी तसेच बालाजी ग्रुपच्या संचालकांनी आयुष याचे अभिनंदन करून त्याचा सत्कार केला.