Video: तक्रारदार तरुणीला पोलिस अधिकऱ्याचे कार्यालयातील बाथरूममध्ये नेलं,पँटची चेन उघडली आणि……धक्कादायक कृत्य करणाऱ्या पोलीस उपअधीक्षकाला अटक

Spread the love

Video: आपल्या पदाचा वापर हा सर्वसामान्य नागरिकांची मदत करण्यासाठी असतो याचे भान अनेक पोलीस अधिकारी विसरताना दिसतात. कर्नाटकातील तुमकूर मधल्या पोलीस उपअधीक्षकाने तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेसोबत केलेल्या कृत्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही.या घटनेचा अज्ञात व्यक्तीने व्हिडीओ रेकॉर्ड केला असून तो व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही घटना आली. यानंतर या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव रामचंद्रप्पा (58 वर्षे) आहे. मधुगिरी इथे हा अधिकारी पोलीस उपअधीक्षक म्हणून तैनात होता. जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये रामचंद्रप्पा एका तरुणीसोबत अश्लील कृत्य करताना दिसला आहे.

तक्रार घेऊन आली होती तरूणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मधुगिरीचीच रहिवासी असलेली महिला जमिनीवरून सुरू असलेल्या वादामुळे पोलिसांची मदत मागण्यासाठी आली होती. याच प्रकरणात तिची रामचंद्रप्पा याच्याशी ओळख झाली होती. गुरुवारी ही तरुणी रामचंद्रप्पाला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये गेली होती. रामचंद्रप्पाने तिला आपल्या केबिनमध्ये बोलावले आणि त्यानंतर तिच्याशी अश्लीलपणे बोलण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने या तरुणीला आपल्यासोबत चल म्हटले आणि तिला बाथरूममध्ये घेऊन गेला. बाथरूममध्ये नेल्यानंतर रामचंद्रप्पाने तरुणीचे कपडे वर केले आणि तिच्यासोबत अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने पँटची चेन उघडली आणि त्या तरुणीला खाली बसवले. ही तरुणी जेव्हा वर उठली तेव्हा तिची नजर बाथरूमबाहेरून व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्यावर गेली होती. यानंतर ती तिथून पळून गेली आणि रामचंद्रप्पाही पळाला. तेवढ्यात व्हिडीओ रेकॉर्ड करणाराही पळून गेला. व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला, ज्यानंतर तो वेगाने व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे रामचंद्रप्पाला निलंबित करून अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणीही पुढे आली असून तिने आपल्यासोबत काय घडले याची वाच्यता केली. पोलिसांनी तिची तक्रार लिहून घेतली आहे. तुमकूरमधील ही घटना सत्ताधारी काँग्रेससाठी चिंतेची बाब बनली आहे कारण मधुगिरी शहर हे तुमकूरमध्ये येतं आणि तुनकूर हा जी.परमेश्वर यांचा मतदारसंघ आहे. परमेश्वर हे कर्नाटकचे गृहमंत्री आहेत. तक्रारदार तरुणीचे म्हणणे आहे की तिने पोलिसांकडे तक्रार केली होती मात्र रामचंद्रप्पाने त्यावर काहीही कारवाई केली नव्हती. रामचंद्रप्पाची सुरुवातीपासून आपल्यावर वाईट नजर होती आणि तो शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होता असेही या तरुणीने म्हटले आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी